आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Concentration Camp To Be Transformed Into Luxury Beach Resort

कधीकाळी येथे कैद्यांचा व्हायचा छळ, आता होणार सुखसोईंनी युक्त बीच रेस्तरॉं

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुस-या महायुध्‍दातील कन्सनट्रेशन कॅम्प(छळ छावणी) असलेल्या साध्‍या बेटाला मॉन्टेनिग्रो सरकार आरामदायी बीच रेस्तरॉंमध्‍ये बदलणार आहे. येथे नाईटक्लब, स्पा आणि रेस्तरॉंपासून सर्व सुविधा उपलब्ध असतील. सरकारच्या या निर्णयामुळे छळ छावणीत राहिलेल्या कैद्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
छळ आणि उपासमारीमुळे कैद्यांना जीव गमवावा लागला...
- ही छावणी मॉन्टेननिग्रो देशातील क्रो‍एशियाच्या सीमेवरील चिमुकला बेट आहे(लास्टाविका नावाने ओळखले जाते).
- त्याची निर्मिती एका किल्ल्याप्रमाणे आहे. तो 1853 मध्‍ये नौदलाच्या हल्ल्यांपासून बचाव करण्‍यासाठी बनवला होता.
-फॅसिस्ट नेता बेनिटो मुसोलिनीच्या शासन काळात इटलीच्या सैन्याने आपल्या ताब्यात हे बेट घेतले होते.
- दुस-या महायुध्‍दात ते छळ छावणीत बदलण्‍यात आले होते. तेव्हा येथे 2 हजारापेक्षा जास्त लोक कैद होते.
- अनेक कैद्यांचा छळ करण्‍यात आला आणि जीव गमवावे लागले. कैक जणांनी उपासमारीमुळे मृत्यू झाला.
होणार पंचतारांकित बीच रेस्तरॉं
- सरकारने या ठिकाणाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 2013 मध्‍ये जहिरात दिली.
- मागील वर्षी स्वित्झर्लंडची कंपनी ओरासकॉमने 49 वर्षाच्या भाडेतत्त्वावर करार केला.
- 106 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या माध्‍यमातून 200 जणांना नोक-या मिळतील, असे सरकारने सांगितले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कधीकाळी छळ छावणी असलेल्या चिमुकल्या बेटाची छायाचित्रे...