आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या व्हिडिओत दिसला दहशवादी डॉक्टर, गायक; एकाची पत्नी आहे मॉडल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेन्टीस्ट असलेल्या तुषारने मॉडल नायला नईमशी 2011 मध्‍ये विवाह केला होता. मात्र दोघे नंतर वेगळे झाले. - Divya Marathi
डेन्टीस्ट असलेल्या तुषारने मॉडल नायला नईमशी 2011 मध्‍ये विवाह केला होता. मात्र दोघे नंतर वेगळे झाले.
ढाका - बांगलादेशची राजधानीत गेल्या शुक्रवारी झालेल्या हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेटने (आयएसआयएस) एक व्हिडिओ जारी केला होता. व्हिडिओत दिसत असलेल्या तीन दहशतवाद्यांमध्‍ये एका दहशतवाद्याची एकेकाळची पत्नीही आहे. ती एक प्रसिध्‍द मॉडल आहे. दहशतवादी बांगलादेश लष्‍करातील माजी मेजर वशीकुर आझाद यांचा मुलगा आहे. डेन्टीस्ट असलेल्या तुषारने मॉडल नायला नईमशी 2011 मध्‍ये विवाह केला होता. मात्र दोघे नंतर वेगळे झाले. व्हिडिओत दिसत असलेले इतर दोन दहशतवाद्यांमध्‍ये एक गायक तर दुसरा एमबीए झालेला होता. डेन्टीस्ट आहे तुषार...
- तुषार एक डेन्टीस्ट आहेत. तो 2 वर्षांपासून बेपत्ता आहे. मॉडल असण्‍याबरोबरच नायला डेन्टिस्टही आहे. सध्‍या ती बांगलादेशी चित्रपटांमध्‍येही काम करत आहे.
- तुषार आदमजी कॅण्‍टोनमेण्‍ट पब्लिक स्कूल व राजूक उत्तरा मॉडल स्कूलमध्‍ये शिक्षण घेतले आहे.
व्हिडिओतील इतर दोन दहशतवादीही उच्च शिक्षित
- व्हिडिओत जे इतर दोन दहशतवादी आहेत त्यांचे नाव तौसीफ हुसेन व तहमीद रहमान शफी असे सांगितले जात आहे.
- तौसीफने ढाका विद्यापीठाच्या इन्स्टीट्यूट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन(आयबीए) प्रवेश घेतला होता. मात्र तो अभ्‍यासक्रम पूर्ण होण्‍यापूर्वीच निघून गेला.
- यापूर्वी हुसेनला जमातुल मुजाहिदीन बांगलादेशशी(जेएमबी) संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्‍यात आली होती.
- तौसीफला त्याचृया कुटुंबीयांनी ऑस्ट्रेलियाला पाठवले होते. मात्र त्याच्या मित्रांनी सांगितले, की तो ऑस्ट्रेलियाला आलाच नव्हता.
- तिसरा दहशतवादी तहमीद रहमान शफी 1995 मध्‍ये एका संगीत रिआलिटी शोच्या टॉप 10 स्पर्धकांमध्‍ये सहभागी होता.
- तहमीद, बांगलादेशचे माजी निवडणूक आयुक्त शफीकुर रहमान यांचा मुलगा आहे.
- तहमीद एमबीए धारक आहे.
तहमीदने वडिलांना सीरियात जाण्‍याविषयी सांगितले
- तहमीदचे मित्रांनी सांगितले, की एकदा त्याने आपल्या वडिलांना आयएसआयएसमध्‍ये जाऊन सीरिया-इराक जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी त्याला नकार दिला.
- व्हिडिओत अल रक्काला आयएसआयएसची राजधानी सांगितले आहे.
- व्हिडिओत तिन्ही दहशतवादी बंगाली भाषेत बोलतात. शफी इतर दोघांचे बोलणे इंग्रजीत भाषांतरित करत आहे.
व्हिडिओत काय म्हटले?
- तुम्ही जे पाहिले ते बांगलादेशमधील जिहाद आहे. हे तुम्ही पूर्वी पाहिले नसेल.
- गुलशन कॅफेवरील हल्ल्याविषयी त्यांनी सांगितले, की जे तुम्ही पाहिले, ती फक्त एक झलक आहे. हे पुन्हा होईल, पुन्हा होईल. आतापर्यंत होत राहिल. जोपर्यंत आम्ही जिंकणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला हरवणार.
बातम्या आणखी आहेत...