आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Oklahoma Police Officer Sentenced To 263 Years For Rapes

कायदेशीर अडचणीत सापडलेल्या महिलांवर करत होता अत्याचार, 263 वर्षे कैदेची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओकलाहोमा - अमेरिकेत ओकलाहोमा सिटीमध्ये एका माजी पोलिस कर्मचाऱ्यास 263 वर्षे कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याच्याविरोधात चार महिलांवर बलात्कार केल्याचा तसेच अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्याचा आरोप असून तो सिद्ध झाला आहे. ओकलाहोम सिटी न्यायालयाने डॅनियल होल्त्जक्लाव (29) याला एकूण 36 खटल्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, अारोपी डॅनियल हा कायदेशीर अडचणींचा सामना करत असलेल्या महिलांवर शारीरिक संबंधांसाठी दबाव आणत असे. त्याने डिसेंबर 2013 ते जून 2014 या कालावधीत अनेक महिलांचे शोषण केले. त्याला 2015 मध्ये नोकरीवरून काढून टाकले होते.