आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येमेन बंडखोरांनी केली माजी राष्ट्राध्यक्ष सालेह यांची हत्या; अरब लीगच्या प्रमुखांनी केला निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो/ सना- येमेनचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांची बंडखोर हौथी गटाने हत्या केल्याचे उजेडात आले आहे. सालेह यांनी राजधानीतून पलायन केले होते. 


त्यामुळे येमेनमधील दहशतवादी कारवाया अद्याप थांबलेल्या नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मंगळवारी सौदीच्या नेतृत्वाखाली लढाऊ विमानांनी सना शहराला घेराव घातला आहे.  
शिया हौथी बंडखोरांचा आठवडाभर सालेह समर्थकांशी संघर्ष सुरू होता. त्यानंतर सालेह यांची हत्या करण्यात आली. हौथी बंडखोरांनीच हा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्तेवरून दूर गेलेले अबेड्राबो मन्सूर हादी यांनी येमेनमधील नागरिकांनी इराणचे समर्थन असलेल्या बंडखोरांच्या विरोधात एकजूट दाखवावी, असे आवाहन केले.सना शहरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदीने त्यात हस्तक्षेप केल्याने हिंसाचारात आणखी वाढ झाली आहे. सोमवारी राजधानीत मोठ्या प्रमाणात बाँब गोळे डागले जात होते. त्या दरम्यान गेल्या काही तासांत हौथी व सालेह समर्थकांत दक्षिणेकडील जिल्ह्यांत काही ठिकाणी धुमश्चक्री उडाली होती.    

बातम्या आणखी आहेत...