आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्बेकिस्तानच्या क्रूर हुकुमशहाची मॉडेल व पॉप सिंगर मुलगी पागलखान्यात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुलनाराचा फाईल फोटो आणि इनसेटमध्ये तिचे पिता आणि उज्बेकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव.... - Divya Marathi
गुलनाराचा फाईल फोटो आणि इनसेटमध्ये तिचे पिता आणि उज्बेकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव....
इंटरनॅशनल डेस्क- आशियाई देश उज्बेकिस्तानमधील सर्वात चर्चित चेहरा म्हणजेच माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव यांची मुलगी गुलनारा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका लंडन बेस्ड पब्लिकेशनच्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षापासून नजरबंद असलेली गुलनारा सध्या उज्बेकिस्तानच्या एका मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. तसेच हे काम सध्याचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्जियोव यांनी केले आहे. कारण, इस्लाम करीमोव यांच्या मृत्यूनंतर गुलनारा हीच राष्ट्राध्यक्षपदाची प्रबळ दावेदार होती. मागील महिन्यात 2 सप्टेंबर रोजी करीमोव यांच्या मृत्यूनंतर शौकत यांनी हे पाऊल उचलले आहे. क्रूर हुकुमशहा होता करीमोव...
- जगातील एक क्रूर हुकुमशहाच्या यादीत उज्बेकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव यांचे नाव होते.
- करीमोव 1991 ते 2016 पर्यंत उज्बेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष राहिले.
- करीमोव यांच्या क्रूर हुकुमशहा राजवटीच्या इतक्या काळात एकदाच आव्हान मिळाले ते ही आपल्याच गुलनारा या मुलीकडून.
- सुंदर गुलनारा उज्बेकिस्तानची फेमस मॉडेल आणि पॉप सिंगर सुद्धा राहिली आहे.
- गुलनाराच्या वाईट दिवसाची सुरुवात तिच्याच पित्याच्या काळात झाली होती.
- याबाबत सांगितले जाते की, करीमोव यांनीच गुलनारा खूप अत्याचार केले व शेवटी तिला दोन वर्षापासून नजरकैदेत ठेवले.
- करीमोव यांचा इतिहास क्रूरच राहिला आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात कोणीच बोलण्याची हिंमत नव्हती. अखेर करीमोवला मुलगी गुलनारानेच आव्हान दिले होते.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, आपल्या क्रूर पित्याला आव्हान देणा-या गुलनाराचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...