आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 4000 रुपयांत या किल्ल्याचे मालक व्हा, अशी आहे प्रोसेस...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसऱ्या महायुद्धात हा किल्ला उद्ध्वस्त झाला. - Divya Marathi
दुसऱ्या महायुद्धात हा किल्ला उद्ध्वस्त झाला.
इंटरनॅशनल डेस्क - दुसऱ्या महायुद्धानंतर रिकामा पडलेला किल्ला विक्रीसाठी तयार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, केवळ 4 हजार रुपये (46 पौंड) देऊन आपण या किल्ल्याचे मालक होऊ शकता. दुसऱ्या महायुद्धानंतर उद्वध्वस्त झाल्यानंतर या किल्ल्याच्या डागडुजीचे काम अद्याप झाले नाही.
 

- फ्रान्सच्या दोर्दोग्ने प्रांतात असलेला हा किल्ला 15 व्या शतकात उभारण्यात आला होता. फ्रान्समध्ये यास ऐतिहासिक वारसाचा दर्जा आहे.  
- या किल्ल्यात 8 बेडरूम, स्विमिंग पूल आणि एका पवनचक्कीसह प्रशस्त प्रांगण आहे. 
- दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मन सैनिकांनी त्यावर हल्ला केला होता. तेव्हापासूनच तो तसाच पडलेला आहे. 
- 1944 मध्ये नाझींनी त्यामध्ये आग लावली होती. त्यामुळे, या किल्ल्याचे असे हाल झाले. 
- गेल्या 75 वर्षांपासून रिकामा असलेल्या या किल्ल्याची अवस्था पाहून फ्रान्स सरकारने ते आपल्या नियंत्रणात घेतले. तसेच किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी मालक कंपनीला 21 सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली. डागडुजी न झाल्यास सरकार त्याचे लिलाव करणार आहे. 
 

46 पौंडमध्ये खरेदीचे ऑफर
- तर दुसरीकडे, किल्ल्याची डागडुजी करून त्याला लिलावापासून वाचवण्यासाठी एका समूहाने मोहिम छेडली आहे. 'अडॉप्ट अ चैट्यु' नावे सुरू असलेल्या या कॅम्पेनमध्ये 4,62,000 पौंड गोळा करण्याचे लक्ष्य आहे. 
- ग्रुपने लोकांना ते खरेदीसाठी प्रवृत्त करण्याकरिता पब्लिक पार्टनरशिप अंतर्गत 46 पौंडच्या गुंतवणुकीची विनंती केली आहे. 
- अर्थात 46 पाउंड (फक्त 4 हजार रुपये) खर्च करून कुणीही किल्ल्याचा मालिक होऊ शकतो. या किल्ल्यास सामुहिक मालकी दिली जाणार आहे.
- आतापर्यंत समूहाला 1 लाख पौंड मिळाले आहेत. हा किल्ला सांस्कृतिक वारसा म्हणून विकसित करणे हे या समूहाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
बातम्या आणखी आहेत...