आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Countries Decided To Resume Peace Talks With Taliban

नवी आशा : तालिबानशी शांतता प्रक्रियेवर चार देश एकत्र येण्यास तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल / इस्लामाबाद - अफगाणिस्तानमध्ये शांततेच्या मुद्द्यावर सोमवारी चार देशांची बैठक इस्लामाबादमध्ये होत आहे. यामध्ये तालिबानशी चर्चा सुरू करण्याच्या प्रक्रियेवर विचार केला जाईल. बैठकीत चीन, अमेरिका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान १४ वर्षांपासून अशांतता पसरवत आहे. बैठकीत तालिबानचा प्रतिनिधी सहभागी होणार नाही. उच्चस्तरीय सूत्रांनुसार, बैठकीत पाकिस्तान एक यादी सादर करणार असून त्यात तालिबान शांतता चर्चेत भाग घेऊ इच्छिणारे लोक सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्लांचे उपप्रवक्ते जाविद फैजल म्हणाले, पाकिस्तानच्या यादीत चर्चेला विरोध करणाऱ्यांचीही नावे असतील. फैजल म्हणाले, पाकिस्तानच्या क्वेट्टा, पेशावर आदी शहरांतील तालिबान बंडखोरांची आर्थिक मदत बंद करण्यात आली आहे. तेथील अतिरेक्यांना अफगाणिस्तानात हल्ले करू दिले जाणार नाहीत. पाकिस्तान तालिबानला मदत करत असल्याचा अमेरिका आणि अफगाणिस्तानचा आरोप पाक चुकीचा ठरवत आला आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये हार्ट ऑफ एशिया परिषद झाली होती. त्यात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनींसह १४ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात अफगाणिस्तानात शांतता कायम ठेवण्यावर चर्चा झाली होती.

कोण आहे तालिबान
पश्तून शब्द तालिबपासून तालिबान शब्दाची उत्पत्ती झाली. त्याचा अर्थ विद्यार्थी असा होतो. तालिबान अफगाणिस्तानची एक कट्टर इस्लामी राजकीय संघटना आहे. १९९६ ते २००१ पर्यंत ते सत्तेत होते. अमेरिकेने हल्ला करून त्यांना सत्ताच्युत केले हेाते. त्या वेळपासून अमेरिका आणि विदेशी सेना तसेच विदेशी समर्थक सरकारच्या विरोधात युद्ध सुरू आहे. सत्तेत असताना तालिबानने कट्टर शरिया कायदा लागू केला होता.

नव्या जिहादी जॉनला भरती करू इच्छित होता एमआय
लंडन - ब्रिटिश गुप्तचर संस्था एमआय ५ ने भारतीय वंशाच्या सिद्धार्थ धरला डबल एजंट बनवण्याचा प्रयत्न केला हेाता. मात्र, तो सिरियात पळून जाण्यात यशस्वी ठरला. सिद्धार्थ धरच दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा (आयएस) कथित नवा जिहादी जॉन आहे. एका प्रसारमाध्यमातील वृत्तात हा दावा करण्यात आला आहे.

संडे टाइम्सच्या वृत्तानुसार, दहशतवादी कारवायांसाठी अटक होण्याआधी एमआय ५ च्या अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ धरशी दोन वेळा संपर्क केला होता. अायएसने त्याला नवा जिहादी जॉनच्या रूपात समोर आणले आहे. सुरक्षा संस्थेतील एका सूत्राच्या म्हणण्यानुसार, ३२ वर्षीय सिद्धार्थ ऊर्फ अबू रुमायसाहला रस्त्यात अडवून तो एमआय ५ च्या रडावर असल्याचा इशारा दिला होता. त्याच्या हालचालीवर पाळत ठेवली जात असल्याचे सांगितले. दुसऱ्यांदा संपर्क केला तेव्हा त्यास गुप्तचर संस्थेसाठी काम करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याने आपल्या उत्तरात काय सांगितले, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

सिद्धार्थ आयएससाठी मरण्यास तयार
लंडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या कोनिका धरने गेल्या आठवड्यात भाऊ सिद्धार्थला गेल्या वर्षी एक संदेश पाठवला होता. जामिनावर सुटका झाल्यावर बेपत्ता सिद्धार्थ गरोदर पत्नी आणि चार मुलांसोबत ब्रिटनमधून पळून गेला होता. त्याने संदेशात म्हटले हाेते की, मी मरण्यास तयार आहे. गेल्या वर्षी दूरध्वनीवर माझी काळजी करू नको, असे सांगितले होते.