आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US: अश्वेतांच्या गोळीबारात 5 पोलिस ठार, पोलिसांच्या निदर्यीपणाचा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृष्णवर्णीयांवर फायरिंग करणाऱ्या पोलिसांच्या निषेधार्थ आंदोलन करत असलेल्या कृष्णवर्णीय कार्यकर्त्याला अटक करताना पोलिस. - Divya Marathi
कृष्णवर्णीयांवर फायरिंग करणाऱ्या पोलिसांच्या निषेधार्थ आंदोलन करत असलेल्या कृष्णवर्णीय कार्यकर्त्याला अटक करताना पोलिस.
डल्‍लास- अमेरिकेत पोलिसांनी दोन कृष्णवर्णीय तरुणांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केली होती. त्‍याच्‍या निषेधार्थ सुरु असलेल्‍या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले. आंदोलक कृष्‍णवर्णीयांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यात पाच पोलिसांचा मृत्‍यू झाला असून, 6 गंभीर आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह 4 जणांना अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन कृष्णवर्णीय तरुणांना कसे निदर्यपणे ठार मारले होते याचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. यामुळेच आंदोलन हिंसक झाल्याचे सांगितले जात आहे.
पोलिस आणि आंदोलकांत 45 मिनीटे गोळीबार...
> अटक करण्‍यात आलेले आंदोलक पार्किंगमध्‍ये दबा धरून बसले होते.
> काही कळायच्‍या आत त्‍यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली.
> पोलिसांना बचावाची संधी त्यांनी दिली नाही. दरम्‍यान, पोलिसांनीही गोळीचे उत्‍तर गोळीने देणे सुरू केले.
> यात पाच पोलिसांचा मृत्‍यू झाला तर सहा जण जखमी झाले. या शिवाय एक नागरिकसुद्धा जखमी झाल्‍याचे महापौर माईक रॉलिंग्स यांनी सांगितले.
डल्लासवरून विमान उड्डाणे रद्द
या घटनेमुळे डल्‍लासमध्‍ये सुरक्षा व्‍यवस्‍था वाढवण्‍यात आली असून, सुरक्षेच्‍या दृष्‍टीने डल्लास विमानतळावरून सर्वच विमान उड्डाणे रद्द करण्‍यात आलीत.
का होत होते आंदोलन
- दोन दिवसांमध्ये मिन्नेसोटा आणि लुसियाना येथे पोलिसांकडून झालेल्या फायरिंगच्या निषेधार्थ कृष्णवर्णीयांचे आंदोलन सुरु होते.
- गुरुवारी पोलिस फायरिंगमध्ये मिन्नेसोटा येथे फिलान्डो किस्टिले आणि लुसियाणामध्ये एल्टन स्टर्लिंग यांचा मृत्यू झाला होता.
संशयित डिव्हाइस सापडले
- डल्लास पोलिस प्रमुख डेव्हिड ब्राऊन म्हणाले, संशयितांनी बॉम्ब प्लांट करण्याचीही धमकी दिली होती. त्याची चौकशी सुरु आहे.
- पोलिसांनी ज्या ठिकाणांहून बंदुकधाऱ्यांना अटक केली तिथे एक संशयित डिव्हाइसही सापडले.
- पोलिसांनी सांगितले की बॉम्ब स्कॉड त्या डिव्हाइसचा तपास करत आहे.
- डल्लासचे महापौर रॉलिंग्स यांनी सांगितले की पोलिस गोळीबाराच्या निषेधार्थ येथे 800 लोक आंदोलन करत होते.
- आंदोलनाचे स्वरुप लक्षात घेऊन येथे 100 पोलिस तैनात करण्यात आले होते.
- आंदोलन सुरु झाल्यानंतर मोर्चा निघायच्या वेळी गोळीबार करण्यात आला.
पुढील स्लाईडवर बघा, दोन कृष्णवर्णिय तरुणांना पोलिसांनी कशा निदर्यपणे मारल्या गोळ्या... याचे व्हिडिओ आले आहेत समोर.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...