काबूल - अफगाणिस्तानमध्ये जमावाने महिलेला मारहाण करून खून केल्या प्रकरणात चौघा जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. संबंधित महिलेवर कुराण जाळल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, तो आरोप नंतर खोटा ठरला. न्यायालयाने सलग चार दिवस केलेल्या सुनावणीत बुधवारी हा निकाल दिला.
आठ आरोपींना प्रत्येकी १६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, तर १८ जणांना आरोपमुक्त करण्यात आले. एकूण १९ पोलिसांसह ४९ आराेपींविरुद्ध खटला चालला. पोलिसांविरुद्धचा निकाल रविवारी सुनावण्यात येईल. २८ वर्षीय फरखुंदावर कुराण जाळल्याचा आरोप करत जमावाने तिला बेदम मारहाण केली. यानंतर तिला गाडीला बांधून रस्त्यावरून फरपटत नेले व जिवंत जाळले. तिचा मृतदेह काबूल नदीत फेकून देण्यात आला होता. १९ मार्च रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली हाेती.
दोषींना शिक्षेविरुद्ध अपील दाखल करण्याचा अधिकार आहे. आरोपीविरुद्ध हत्या करणे आणि दुस-यांवर हल्ल्यासाठी चिथावणी दिल्याचे आरोप सिद्ध झाले. कर्तव्यात कसूर केल्याचा पोलिसांवर आरोप आहे. घटना घडत असताना त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली,त्यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, या हत्येमागचे मुळ कारण... बऱ्याच धक्कादायक बाबी....