आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत गोळीबारात तिघांचा मृत्यू; हल्लेखोराने स्वत:लाही घातल्या गोळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्लखोर पार्सल बॉयच्या यूनिफॉर्ममध्ये आला होता. - Divya Marathi
हल्लखोर पार्सल बॉयच्या यूनिफॉर्ममध्ये आला होता.
सॅन फ्रान्सिस्को- एका बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार करत तिघांची हत्या केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. हल्लेखोर व्यक्तीने नंतर स्वत:ला गोळी घालत आत्महत्या केली. ही घटना अमेरिकची पार्सल कंपनी यूपीएसच्या वेअरहाऊसमध्ये घडली. हल्ल्यात दोन लोक जखमी झाले आहेत. बुधवारीच वर्जीनिया येथे बेसबॉल प्रॅक्टीस दरम्यान गोळीबारात एका खासदारासमवेत तीन जण जखमी झाले होते. 

यूनिफॉर्ममध्ये आला होता हल्लेखोर

- सॅन फ्रान्सिस्कोचे पोलिस आयुक्त टोनी चॅपलिन यांनी सांगितले की, हल्लेखार व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
- त्यांनी सांगितले की, हल्लेखोर हा पार्सल डिलिव्हरी सेवेच्या यूनिफॉर्ममध्ये आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानूसार हा दहशतवादी हल्ला नाही.
- यूपीएसच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानूसार हा हल्ला एका नाराज कर्मचाऱ्याने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...