आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Sikhs Sworn As Ministers In Canada Parliament

कॅनडाच्या संसदेत 4 पंजाबी मंत्री, संरक्षण, संशोधन-विज्ञान, अर्थ विभागाचा कारभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडामध्ये चार इंडो-कॅनडियन प्रतिनिधींना मंत्रिपद मिळाले. मंत्रिपद मिळालेले चारही प्रतिनिधी पंजाबी आहेत. पैकी दोन शीख आहेत. कॅनडाच्या सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्य केलेले हरजित सज्जन यांची कॅनडाच्या संरक्षण मंत्रिपदी निवड झाली आहे.

चौथ्यांदा संसद सदस्य म्हणून निवडून आलेले नवदीप बन्स यांना संशोधन, विज्ञान आणि आर्थिक विकास मंत्रालयाचा पदभार सोपवला आहे. नवनिर्वाचित पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी बुधवारी पंतप्रधानपदाची शपथ ग्रहण केली. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळाची घोषणा केली. अमरजित सोही यांना संरचनात्मक विकास मंत्रिपद देण्यात आले, तर बंदिश चग्गर यांच्याकडे लघुउद्योग आणि पर्यटन मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला. बंदिश या ३४ वर्षांच्या असून पंजाबी वंशाच्या त्या एकमेव महिला मंत्री आहेत. कॅनडाच्या संसदेत पंजाबी वंशाच्या ६ महिला प्रतिनिधी आहेत.

संसदेत स्थान मिळवलेल्या २० पंजाबी प्रतिनिधींपैकी १८ लिबरल पार्टीचे आहेत, तर लिबरल पार्टीच्या इंडो कॅनडियन वंशीय संसद सदस्यांत १९ जण असून त्यात १६ पंजाबी आहेत. यापूर्वीच्या काँझर्व्हेटिव्ह सरकारमध्येदेखील पंजाबी वंशाचे २ मंत्री होते. मात्र, त्यांच्याकडे महत्त्वाची मंत्रालये नव्हती. बल गोसल क्रीडा मंत्री आणि टीम उप्पल संसदीय सुधार मंत्री होते. या वेळी मात्र पंजाबी प्रतिनिधींना महत्त्वपूर्ण पदे दिली.