आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारवर्षीय मुलीशी लग्न, जगभरातून शुभेच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉटरफोर्ड (आयर्लंड)- चार वर्षांची अॅबी सेलेस कर्करोगाशी झुंजत आहे. लग्न करायचे, ही तिची सर्वात मोठी इच्छा होती. ती पूर्ण केली २९ वर्षाच्या मॅट हिकलिंग या तरुणाने. केवळ तिची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून झालेला हा अनोखा विवाह इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. कोट्यवधी लोकांनी अॅबीला शुभेच्छाही दिल्या.
मॅटे हा पुरुष परिचारक आहे. अॅबीशी त्याची वर्षभरापासून ओळख आहे. एका वर्षापासून मेलोडी चाइल्डहुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अॅबीवर उपचार सुरू आहेत. ती येथे दर आठवड्यात केमाेथेरेपी करण्यासाठी येते. मॅट तिचा हँडलर आहे. अॅबीची आई रिनी सेलेस या म्हणाल्या, अॅबीचे काका व माझी एक मैत्रीण लवकरच लग्न करणार आहेत. आम्ही घरी त्यांच्याविषयी चर्चा करत होतो तेव्हा अचानक अॅबीने मॅटसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली. मग हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडेही तिने लग्नाचाच हट्ट धरला. कुणालाच एवढ्या लहान मुलीकडून इतक्या मोठ्या इच्छेची अपेक्षा नव्हती. पण तिच्या चेहऱ्यावर हसू फुलावे यासाठी मॅट लग्नास तयार झाला.

शेवटी गुरुवारी रुग्णालयाचे कर्मचारी वृद्ध आणि कुटुंबीयांनी धूमधडाक्यात लग्न लावले. यासाठी रुग्णालयाच्या एका वॉर्डला फुलांनी सजवण्यात आले होते. सर्वाधिक चर्चेचा विषय होता अॅबीचा गेटअप. तिने सर्जिकल मास्क मुखवट्यासारखा घातला होता. आवडत्या कार्टून शोमधून लग्नाची अंगठी निवडली. यानंतर मॅट नवरा बनून वॉर्डमध्ये आला. दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. मॅटने आपल्या चिमुकल्या नवरीला हलकेच उचलले... अन् लग्न लागले!

या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. तब्बल दीड कोटी लोकांनी तो पाहिला व शुभेच्छाही दिल्या. रिनी सेलेस म्हणाल्या, अाधी अॅबी हॉस्पिलटमध्ये जाण्यास लवकरच तयार होत नसे. मॅट हँडलर बनल्यापासून तिच्यात खूप बदल झाला. ती दर आठवड्यात हॉस्पिटल जाण्यासाठी स्वत:च तयार होऊ लागली. मॅटशी भेटल्यानंतर अॅबीच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्याचे तिच्या डॉक्टरांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...