आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज यात्रा चेंगराचेंगरी, मृतांमध्ये १४ भारतीयांचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीना- सौदी अरेबियाच्या मक्का या पवित्र शहरात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या १४ झाली आहे. या दुर्घटनेत ७१९ जण ठार, तर ८६३ जण जखमी झाले आहेत. मीनामध्ये सैतानाला दगड मारण्याच्या परंपरेदरम्यान ही दुर्घटना घडली होती.

जेद्दाहमधील महावाणिज्य दूतावासाद्वारे मिळालेल्या माहितीच्या हवाल्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, या दुर्घटनेत १३ भारतीय जखमी झाले आहेत. इराणच्या १३१ आणि पाकच्या ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सौदीचे राजे मोहंमद बिन नायेफ यांनी या दुर्घटनेनंतर हज यात्रेकरूंच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले.