आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांग्लादेशात चौथ्या ब्लॉगरची हत्या, फ्लॅटमध्ये घुसून चाकूने केले वार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशात एका शस्त्रधारी टोळीने शुक्रवारी आणखी एका धर्मनिरपेक्ष ब्लॉगरची हत्या केली. या वर्षातील अशा प्रकारची ही चौथी हत्या आहे. या हत्येची जबाबदारी 'अंसार अल इस्लाम' नावाच्या एका दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
चाकूने केले वार
'बांगलादेश अँड अॅक्टिव्हीस्ट नेटवर्क' ने दिलेल्या माहितीनुसाप, ब्लॉगरचे नाव निलॉय नील असे होते. या टोळीने ढाका येथील गोरान या उपनगरातील त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसून चाकून वार करत निलॉय यांची हत्या केली. नेटवर्कचे प्रमुख इमरान एच सरकारने सांगितले की, शुक्रवारी दुपारी 1.45 वाजता नमाजनंतर दोन हल्लेखोरांचे गोन गट अपार्टमेंटच्या चौथ्या फ्लोअरवर असलेल्या निलॉय यांच्या फ्लॅटमध्ये घुसले. निलॉय त्यावेली मित्रांबरोबर बसले होते. त्यांनी मित्राला धक्का देत निलॉय यांना घेरले आणि एकापाठोपाठ असे चाकूचे वार केले.

भारतीय उपखंडाचे अल कायदा
हत्येची जबाबदारी घेणारी अंसार अल इस्लाम ही संघटना भारतीय उपखंडातील अल-कायदा म्हणूनही ओळखली जाते. माध्यमांना ई मेल करूनही त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ansar.al.islam.bd@gmail.com मेल आयडीवरून आलेल्या ईमेलमध्ये ईशनिंदा करणाऱ्या अशा इतरांनाही ठार करण्याची धमकीही देण्यात आली आहे. दरम्यान पोलिस मात्र या हल्ल्यासाठी अंसारुल्ला बांगला टीमच्या दहशतवागी गटाला जबाबदार ठरवत आहे. या गटावर सरकारने बंदी घातली आहे.

दहशतवाद्यांचे लक्ष्य
इमरान सरकार यांनी सांगितले की, निलॉय हे रेग्युलर ब्लॉगर असल्याने इस्लामी दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. ते त्यांच्या आर्टिकल्सच्या माध्यमातून मुस्लीम पक्षांना बॅन करण्यासाठी मोहीम चालवत होते. त्यांनी अनेकदा 1971 वॉर क्राइमच्या दोषींना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली होती.

यापूर्वी मे महिन्यात बांगलादेश सरकारने अंसारउल्लाह बांगला टीमवर बंदी घातली होती. या ग्रुपवर देशातील सेक्युलर ब्लॉगर्सची हत्या करण्याचा आरोप होता. यापूर्वी मे महिन्यात में ब्लॉगर अनंत बिजॉय दास यांची हत्या करण्यात आली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, यावर्षी किती ब्लॉगर्स आणि लेखकांच्या हत्या करण्यात आल्या...
बातम्या आणखी आहेत...