आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमधील मृतांचा आकडा 5057 वर, भारताच्या आणखी सहा तुकड्या दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू/नवी दिल्ली- नेपाळमधील विनाशकारी भूकंपग्रत बळींचा अधिकृत सरकारी आकडा पाच हजारांच्या वर गेला आहे. मंगळवारी दुपारी या आकड्याने पचा हजाराचा टप्पा गाठला. परंतु, भूकंपाचा केंद्र असलेल्या काठमांडूमध्ये हजारों लोक अजूनही ढिगार्‍याखालीच आहेत. त्यामुळे या भीषण भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या 15 हजारांवर जाण्याची भीती संयुक्त राष्‍ट्राने (युएन) व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, आज (मंगळवार) पहाटे पाच वाजेच्या सुमारास नेपाळमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी होती. त्यानंतर काठमांडूमध्ये दुपारी मुसळधार पाऊस सुरु झाला. यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे ठंडीत वाढ झाली आहे. तापमान 13 डिग्री अंश सेल्सियसवर खाली आले आहे. तसेच पेशावरसह दिर बाला, शांगला, स्‍वात, मलकंद, लोअर दिर आणि आजूबाजूच्या भाग भूकंपाने हादरल्याचे वृत्त ' 'रेडिओ पाकिस्‍तान'ने दिले आहे.

मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु, पावसामुळे मदतकार्यात अनेकदा अडथळा निर्माण होत आहे. त्यात अन्न, पाणी, वीज आणि औषधे अशा जीवनावश्यक गोष्टाचा भीषण तुडवडा निर्माण झाला आहे. भीतीच्या सावटाखाली वावरत असलेले भूकंप पीडित अन्न, पाण्या‍विना कासासीस झाले आहेत.
जगभरातून नेपाळसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. संयुक्त राष्ट्रानेही जगभरातील राष्‍ट्रांना नेपाळला मदत करण्‍यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहेत. यूएनने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भूकंपामुळे 80 लाख लोक प्रभावित झाले आहे. 14 लाख लोकांना अन्न, पाण्याची तातडीने गरज आहे. मरण पावलेल्यांची संख्या 15 हजारांवर जाण्याची भीती भूकंपग्रस्तांची मदत करणार्‍या ‘केअर इंटरनॅशनल’ अभ‍ियानाचे निर्देशक रेक्स केसेनबर्ग यांनी म्हटले आहे. काठमांडूमधील बहुतांश गावे 70 ते 90 टक्के उद्‍धवस्त झाले आहेत.

भूकंपग्रस्त नेपाळसाठी रामदेव बाबा सरसावले, 500 मुले दत्तक घेणार
नेपाळमध्ये जगभरातून मदतीचा ओघ सुरु असताना योगगुरु रामदेव बाबाही भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. भूकंपग्रस्त नेपाळमधील 500 बालकांना दत्तक घेण्याचा द‍िलासादायक न‍िर्णय रामदेव बाबांनी घेतला आहे. या बालकांची खाण्या-पिण्याची, राहण्याची व्यवस्था तसेच पाचवीपर्यंतचे शिक्षण रामदेव बाबा करणार आहेत. दरम्यान, भूकंप झाला तेव्हा रामदेव बाबा नेपाळमध्येच होते. त्यात ते थोडक्यात बचावले.

मंगळवारी पहाटेही बसले भूकंपाचे धक्के
सोमवारी रात्रीनंतर आजही (मंगळवार) सकाळी नेपाळमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. सकाळी पाच वाजून पाच मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे, सर्वात प्रभावित भागाशी संपर्क तुटल्याचे गृहमंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने म्हटले आहे.

LIVE अपडेट्स
6:18 PM: नेपाळमधील मृतांचा औपचारिक आकडा 5057.
4:48 PM: भारततील नेपाळचे राजदूत दीप उपाध्याय म्हणआले, मी भारत सरकार आणि भारतीय नागरिकांचे सहकार्यासाठी आभार मानतो.
4:31 PM : नेपाळचे पंतप्रधान सुशील कोयराला यांनी तत्काळ बैठक बोलावली. विरोधीपक्ष नेते आणि गृहमंत्र्यांनाही बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश.
03:52 PM: इंडियन एयरफोर्सचे AN-32 एअरक्राफ्ट 2 टन भोजन आणि पाणी घेऊन पोखरामध्ये लँड झाले.
3.20 PM: नरेंद्र मोदींनी नेपाळमध्ये पुन्हा घरे उभारण्यास मदत करण्याची घोषणा केली.
3.00 PM: भारताने मंगळवारी एनडीआरएफच्या आणखी सहा तुकड्या नेपाळला पाठवल्या.
2.50 PM : अडकलेल्या लोकांसाठी रेल्वेची खास व्यवस्था. अनेक रेल्वेच्या डब्यांची संख्या वाढवली.

2.45 PM: नेपाळमध्ये मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार, मात्र, लाकडांचा तुटवडा

2:30 PM: अफगाणिस्तानचे राष्ट्रपती मोहम्मद अश्रफ घनी यांच्याकडून दखल, नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी भारताने केलेले मदतकार्य कौतुकास्पद
2:00 PM: नेपाळमधून सुखरुप परतआलेल्या दाम्पत्याने सांगितली आपबिती, 12 हॉटेलमध्ये विचारल्यानंतर मिळाले तीन बाटल्या पाणी
01.45 PM: पाऊस थांबताच नेपाळमध्ये मदतकार्याचा वेग वाढला. भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्‍यासाठी नेपाळमध्ये 100 बस पोहोचल्या- परराष्‍ट्र मंत्रालय

01.10 PM: भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या दहा हजारांवर पोहोचेल, अशी माहिती नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी समाचार एजन्सी 'रॉयटर्स'ला दिली.

01:00PM: पेशावरसह दिर बाला, शांगला, स्‍वात, मलकंद, लोअर दिर आणि आजूबाजूच्या भाग भूकंपाने हादरला -रेडिओ पाकिस्‍तान

12.50PM: तजाकिस्तानाच्या सीमेवर 5.5 तीव्रतेचा भूकंप, कोणतीही हानी नाही.

12:40PM: नेपाळमध्ये भूकंपात 4310 जणांचा मृत्यू , आठ हजारांहून अधिक जखमी

12:30 PM: नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी रसद घेऊन इंडियन एअरफोर्सची विमाने रवाना

12:10 PM: नेपाळमध्ये मदतकार्य योग्य पद्धतीने सुरु, भारतातील लष्करामुळेच सुखरुप परतरले - चेन्नईच्या तरुणीची प्रतिक्रिया

12:00 PM : भूकंपग्रस्त नेपाळमधील 500 मुलांना दत्तक घेण्याचा योगगुरु रामदेव बाबांचा निर्णय

11:50: काठमांडूमध्ये जनजीवन हळूहळू सुरळीत, मदतकार्याला वेग

11.45 AM: नेपाळमधील भूकंपात मरण पावलेल्यांना मुंबईच्या डबेवाल्यांची श्रद्धांजली

10:45 AM: उत्तर प्रदेश सरकारने काठमांडू पाठवले मदत सामग्री, काठमांडूत पोहोचले 18 ट्रक

10:35 AM: नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 'फेसबुक'ने 'donation button' सुरु केले आहे.

9:00 AM: नेपाळहून रक्सौल येथे आणलेल्या शेकडो भूकंपग्रस्तांना भारतीय लष्कर, परराष्‍ट्र मंत्रालय आणि इंडियन ऑईलच्या सहकार्याने घरी पाठवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. - प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे 'ट्वीट'द्वारा माहिती

8:40 AM: काठमांडूतून 207 भारतीयांना इंडियन एअरफोर्सचे हेलिकॉप्टर सी-17 ने पालम एअरपोर्टवर सुखरुप उतरवले.

8:30 AM: बिहारमध्ये मृतांची संख्या 73, केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा आणि अनंत कुमार बिहारमधील भूकंपग्रस्त भागांचा दौरा करणार.
पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रांमधून पाहा, नेपाळमधील विनाशकारी भूकंपाची दाहकता...