आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांचे ‘ते’ अश्रू खरे नव्हे, कांद्याचे!, रडण्याचे नाटक केल्याचा फॉक्स न्यूजचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत दिल्या जात असलेल्या बंदुकीच्या परवान्याबाबत काही दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसवरून बोलताना अध्यक्ष बराक ओबामा यांना अश्रू अनावर झाले हाेते. मात्र, हे अश्रू यावेत म्हणून ओबामा यांनी कच्चा कांदा वापरला होता, असा दावा फॉक्स न्यूजच्या एका पत्रकाराने केला आहे.

या आरोपामुळे अमेरिकेत खळबळ उडाली असून दूरचित्रवाणीवरील एका जाहीर कार्यक्रमात पत्रकार अँड्रिया यांनी हा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, ओबामांना खरोखर रडू कोसळले असेल यावर माझा विश्वासच बसत नाही. ओबामा ज्या व्यासपीठावरून बोलत होते ते तपासले पाहिजे. कदाचित तेथे कच्च्या कांद्याचे तुकडे मिळतील. याच कार्यक्रमात तिच्यासोबत सहभागी असलेली मलिसा फ्रांसिसनेही ओबामांचे हे राजकारण अत्यंत किळसवाणे असल्याचे म्हटले आहे. देशातील आघाडीचा माध्यम समूह म्हणून ओळख असलेल्या फॉक्स न्यूजच्या अनेक पत्रकारांनी यापूर्वीही अनेकदा ओबामांवर टीका केली आहे. अमेरिकेत गेल्या काही वर्षांत गोळीबारात अनेकांचे बळी गेले आहेत. विशेषत: २०१२ मध्ये एका शाळेवर झालेल्या हल्ल्याने तर जगाचे मन हेलावले हाेते. या देशात प्रत्येक कुटुंबाला बंदूक मिळण्याचा परवाना असल्यानेच हिंसाचारात वाढ होत असल्याचे ओबामा सांगत होते. या वेळी शाळेवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देताना ओबामा यांचे डोळे भरून आले हाेते.