आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • France Affected By Supertide Of The Century In Pictures

It\'s Horrible: भरतीचे अक्राळ-विक्राळ रुप, लाटा उसळ्या 46 फुटांपर्यंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: नॉरमेडीचे मॉन्ट सेन्ट मायकल

फ्रान्सचा उत्तर अटलांट‍िक किना-याला मोठ्याप्रमाणावर समुद्राच्या भरतीचा सामना करावा लागत आहे. त्यास 'टाइड ऑफ द सेंच्युरी आणि सुपरटाईड असे म्हटले जाते. भरतीत 14 मीटर उंच लाटानिर्माण झालेत. फ्रान्सच्या नॉरमेंडीत सुपरटाईड ऐतिहासिक मॉन्ट सेन्ट मायकल आयर्लंडमध्‍ये रुपांतरित झाला आहे. त्याच्या चहूबाजूने इंग्लिश चॅनलचे पाणी आहे. बेटापर्यंत जाण्‍याच्या मार्गावर पाणी आले आहे.

तज्ज्ञांनुसार, लाटांची उंची चार मजली इमारती इतकी असून ती खूप वेगाने वाढत आहे. त्या 46 फुट इतक्याही असू शकतात. सुपरटाइड पाहण्‍यासाठी दहा हजार लोकांनी मॉन्ट सेन्ट मायकल आणि अन्य पर्यटक स्थळांना भेटी दिल्या आहेत.

या सुपरटाइडला सूर्यग्रहणाचा परिणाम म्हटले जात आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्‍वी जेव्हा एकारेषेत येतात, तेव्हा प्रत्येक 18 वर्षात अशी दुर्मिळ स्थिती तयार होते. शतकातील हा पहिली भरती आहे. यापूर्वी 10 मार्च, 1997 साली अशाच प्रकारची भरती आली होती. आता असा योग 2033 मध्‍ये येणार आहे.

पुढे पाहा, सुपरटाइडने फ्रान्सवर झालेल्या परिणामाची स्थितीचे PHOTOS: