आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13/11 ची दहशतः आता फ्रान्समध्ये फटाक्यांनीही पळापळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- हे छायाचित्र पॅरिसमधील डी ला रिपब्लिक चौकाचे आहे. अतिरेकी हल्ल्यात ठार झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे रविवारी कँडल मार्च काढला होता. त्या वेळी कोणीतरी फटाके फोडले. लोकांना वाटले पुन्हा हल्ला झाला. सर्व लोक पळू लागले. या वेळी एका पित्याने आपल्या मुलांना कवेत घेऊन त्यांना धीर दिला.

फ्रान्सकडून प्रत्युत्तराची कारवाई सुरू
-अतिरेक्यांना पकडण्यासाठी फ्रान्सच्या पाच शहरांत २०० पेक्षा जास्त ठिकाणी छापे.
-२४ पेक्षा जास्त लोकांना अटक, रॉकेट लाँचर, पिस्तुले, एके-४७ रायफली जप्त.
-सिरियात आयएस राजधानी रक्कावर १२ विमानांनी १५० हून जास्त ठिकाणी हल्ले केले.
-ब्रिटनवर हल्ल्याची शक्यता. हेरांच्या संख्येत वाढ. हवाई सुरक्षेवरील खर्चात दुप्पट वाढ.
हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्देल हामिद हा पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंडड असल्याचे म्हटले जात आहे. तो बेल्जियमचा आहे.त्याने २०१२ मध्ये येमेनमधील हल्ल्याचा कट रचला होता.