आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • France Drops 20 Bombs On ISIS Syria Stronghold Raqqa

पॅरिस हल्ला : फ्रान्‍सचा IS च्‍या तळांवर हल्‍ला, सीरियामध्‍ये टाकले 20 बॉम्‍ब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियाकडे उड्डाण भरताना फ्रान्‍सचे लढाऊ विमान. - Divya Marathi
सीरियाकडे उड्डाण भरताना फ्रान्‍सचे लढाऊ विमान.
पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 13 नाव्‍हेंबरच्‍या रात्री 'इसिस' (आयएसआयएस) च्‍या दहशतवाद्यांनी सहा ठिकाणी आत्मघाती हल्ले करून बेछूट गोळीबार केला. त्‍यामुळे संपूर्ण जग हादरवून गेले. दरम्‍यान, या हल्‍ल्‍याचा बदला म्‍हणून फ्रान्‍सने सीरियातील आयएसआयएसच्‍या तळांवर हल्‍ले सुरू केले असून, फ्रान्‍सच्‍या लढाऊ विमानांनी सीरियाच्‍या रक्का शहरात 20 पेक्षा अधिक बॉम्‍ब टाकले आहेत. हे शहर आयएसआयएसचा बालेकिल्‍ला मानला जातो.
फ्रान्‍सच्‍या संरक्षण मंत्रालयाने काय म्‍हटले ?
> फ्रान्‍सच्‍या संरक्षण मंत्रालयानुसार, लढाऊ विमानांनी आयएसचे कमांड सेंटर, स्‍फोटकांचा एक साठा आणि त्‍यांच्‍या शिबिरांवर हल्‍ले केले आहेत.
> संयुक्त अरब अमीरात (यूएई) आणि जॉर्डनमध्‍ये दहा लढाऊ विमानांनी आयएसच्‍या तळांवर हवाई हल्‍ले केले.
> फ्रान्‍सने एकाच वेळी अनेक‍ जागांवर छापेमारी सुरू केली आहे.
> पुन्‍हा हवाई हल्‍ले करण्‍यासाठी सैन्‍याने शनिवारी सायंकाळी परवानगी घेतली.
फ्रान्‍सच्‍या राष्ट्रपतींनी काय म्‍हटले ?
आयएसएसने पॅरीसवर हल्‍ला करून युद्धाची घोषणा केली, असल्‍याचे फ्रान्‍सचे राष्ट्रपती फ्रांसुआ ओलांद म्‍हणाले. ते म्‍हणाले, ''पॅरीसवर हल्‍ला करणारे कोण आहेत, याची आम्‍हाला माहिती आहे. आम्‍ही याचा बदलला घेऊ. त्‍यांना क्रुरतेने मारू'', असे ते म्‍हणाले.
आणखी हल्‍ले करण्‍याची आयएसआयएसची धमकी
पॅरिस हल्‍ल्‍यानंतर आयएसआयएसने एक व्‍हीडियो मॅसेज प्रसारित केला. त्‍यात म्‍हटले, फ्रान्‍सला सुखाने जगू देणार नाही. सीरिया आणि इराकच्‍या बाहेरही आमची संघटना हल्‍ला करण्‍याची क्षमता बाळगून आहे. यापुढेसुद्धा फ्रान्‍समध्‍ये असे हल्‍ले केले जाणार आहेत'', अशी धमकी त्‍यांनी दिली.