आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का टार्गेट होत आहे फ्रान्स ? राष्ट्रपती म्हणाले- आता त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसच्या जवानांनी आतापर्यंत  8 दहशतवाद्यांना ठार मारले आहे - Divya Marathi
पॅरिसच्या जवानांनी आतापर्यंत 8 दहशतवाद्यांना ठार मारले आहे
पॅरिस - फ्रान्समध्ये एका वर्षात झालेला हा चौथा सर्वात मोठा हल्ला आहे. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर फ्रान्स का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री पॅरिसमध्ये सात ठिकाणी झालेल्या हल्ल्यात 155 लोक मारले गेले या हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएसने घेतली आहे. याआधी झालेले तिन्ही हल्ले आयएसआयएसने केले होते. दरम्यान, रात्री झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रपती फ्रास्वा ओलांद यांनी तिखट प्रतिक्रिया देत म्हटले आहे, की याचे कठोर उत्तर दिले जाईल. ते म्हणाले, 'आम्हाला माहित आहे यामागे कोण आहे. आता आम्ही याचे उत्तर त्यांच्याच भाषेत देऊ.'
फ्रान्स टार्गेट करण्याची कारणे

पहिले कारण
सीरिया आणि इराकमध्ये फ्रान्स अमेरिकन फौजांना साथ देत आले आहे. त्यामुळे फ्रान्स आयएसआयएसच्या निशाण्यावर आहे. अमेरिकेच्या नेतृत्वातील आर्मीमध्ये फ्रान्सच्या फौजा दहशतवादाविरुद्ध लढत आहेत. फ्रान्स केवळ सीरिया, इराकमध्येच नाही तर माली आणि लिबियामध्येही अमेरिकन सैन्याला साथ देत आहे. फ्रान्सने विदेशात जिहादिंविरोधातील लढाईसाठी 10 हजार सैनिक पाठवलेले आहेत. त्यात पश्चिम आफ्रिकेत 3 हजार, मध्य आफ्रिकेत 2 हजार आणि 3200 सैनिक इराकमध्ये तैनात आहेत.

दुसरे कारण
संपूर्ण यूरोपमध्ये फ्रान्समध्ये सर्वाधिक मुस्लिम राहातात. त्यामुळे येथे आयएसआयएसला आपले स्लिपर सेल सहज अॅक्टिव्ह करता येतात. यूरोपाच्या सीमाभागातील देशातून यांना सहजरित्या शस्त्र, स्फोटके प्राप्त होतात. इस्लामी जिहादविरोधात फ्रान्स कायम अमेरिकेसोबत राहिले आहे.
तिसरे कारण
फ्रान्सने मालीमध्ये 2013 मध्ये अल कायदाविरुद्ध मोर्चा उघडला होता. येथे त्यांचा लढा अल कायदाची सर्वात कमकुवत संघटना (दहशतवादी ग्रुप) इस्लामिक मगरीबसोबत होता. पंधरा दिवसांपूर्वी AQIM च्या नेत्यांनी त्यांच्या समर्थकांना फ्रान्सवर हल्ला करण्यास सांगितले होते.
चौथे कारण
गेल्या आठवड्यात फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रास्वा ओलांद यांनी घोषणा केली होती, की इस्लामिक स्टेट विरोधातील लढाईसाठी ते इराकच्या आखाती भागात एअरक्राफ्ट कॅरिअर तयार करतील.