आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारमध्ये आग; १३ जणांचा मृत्यू , फ्रान्समधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिन्नीस - फ्रान्सच्या उत्तरेकडील एका बारमध्ये लागलेल्या आगीत किमान १३ जणांचा गुदमरून व होरपळल्याने मृत्यू झाला. ही घटना रोईन भागात घडली. बर्थडे पार्टी सुरू असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बारमध्ये आग लागली होती. इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली त्या वेळी बारमध्ये वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू होते. आगीत किमान १३ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५० कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही, परंतु केकच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या मेणबत्त्या आगीचे कारण असू शकतील, असा प्राथमिक अंदाज आहे.

मृतांमध्ये १८ ते २५ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, पंतप्रधान मॅन्युअल वाल्स यांनी आगीत १३ तरुणांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. वास्तविक फ्रान्समध्ये अशा आगीच्या घटना दुर्मिळच आहेत. कारण यापूर्वी नोव्हेंबर १९७० मध्ये आगीची एक घटना घडली होती. त्यात १४६ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, फ्रान्स अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देखील भयचकित आहे. त्यात आगीत निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यामुळे बारमधील आगीमागे काही घातपात आहे का, असा संशय व्यक्त केला जात होता. दुसरीकडे शनिवारी जगप्रसिद्ध आयफेल टॉवर परिसरात सुरक्षा दलाच्या वतीने मॉकड्रील करण्यात आले. प्रात्यक्षिकासाठी हा परिसर खाली करण्यात आला होता.

मेणबत्तीने केला घात
बारमध्ये स्फाेट वगैरे झालेला नाही. बर्थडे पार्टीमध्ये मेणबत्तीचा वापर करण्यात आला होता. मेणबत्तीमुळे पेट घेतला असावा, असा दावा एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केला आहे. बारचे सीलिंग पॉलिस्टर असल्याने ते काही वेळात आगीच्या भक्षस्थानी पडले. पॉलिस्टरमुळे आत विषारी वायू तयार झाला. त्यात अनेक जण गुदमरले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...