आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • France Government Give Spying Right To Parliament

फ्रान्स सरकारने संसदेला दिला हेरगिरीचा अधिकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फ्रान्स सरकार आता आपल्या कोणत्याही नागरिकावर हेरगिरी करू शकेल. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने मंगळवारी सरकारला मोठ्या बहुमताने हे अधिकार बहाल केले. मानवी हक्क गटांनी याला कडाडून विरोध केला आहे. संसदेत ४३८ सदस्यांनी प्रस्तावाचे समर्थन केले, तर ८६ जणांनी त्यास विरोध दर्शवला. या प्रस्तावाला सिनेटची मंजुरी घेतली जाईल.
फ्रान्समध्ये नागरिकांवर निगराणी ठेवण्याच्या मुद्द्यावर दीर्घ काळापासून चर्चा सुरू होती. मात्र, जानेवारीमध्ये दहशतवादी हल्ल्यात १७ जण ठार झाल्यानंतर प्रस्तावाच्या बाजूने वातावरण तयार झाले होते. पंतप्रधान मॅनुअल वाल्स यांनी याला पाठिंबा देत अमेरिकेच्या पॅट्रियट अॅक्टचा हवाला दिला. ९/११ च्या हल्ल्यानंतर हा अधिनियम तयार करण्यात आला होता. दहशतवादाच्या विराेधात दाेन्ही देश एकत्र लढत अाहेत.

कनिष्ठ सभागृहातील मतदान
४३८ जणांचे बाजूने
८६ जणांचे विरोधात

काय आहे कायदा?
> अधिकारी दहशतवादी कारवायांत सहभागी होण्याच्या संशयावरून कोणत्याही नागरिकावर पाळत ठेवू शकतील.
> हेरगिरीसाठी अधिका-यांना कोणत्याही न्यायाधीशाची परवानगी लागणार नाही.
> कोणत्याही व्यक्तीच्या डिजिटल किंवा मोबाइल संवादावर लक्ष ठेवले जाऊ शकते.
> इंटरनेट सेवा देणा-यांना कोणत्याही व्यक्तीचे विवरण द्यावे लागेल.
> गुप्तचर सेवेला खासगी निवासस्थानी गुप्त कॅमेरे किंवा रेकॉर्डिंगचे अधिकार असेल.