आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींनी फ्रान्समध्ये खांद्यावर ओढली \'NM\'ची शाल, सोशल मीडियाचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पॅरिस एअरपोर्टवर शाल ओढलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी. शालवर ठिकठिकाणी 'एनएम' लिहिले आहे.)
पॅरिस- पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचा दौरा आटोपून जर्मनीसाठी रवाना झाले आहेत. पुढील तीन दिवस ते जर्मनीत राहातील. परंतु, फ्रान्समध्ये नरेंद्र मोदींनी खांद्यावर ओढलेल्या शालीवरून नवा निर्माण झाला आहे. सोशल मीडियाने दावा केला आहे की, या शालीवर ठिकठिकाणी 'एनएम' असे प्रिंट केले आहे.

पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या एअरपोर्टवर उतरताना त्यांच्या खांद्यावर एक शाल ओढलेली दिसली. एअरपोर्टवरील मोदींचे फोटो सोशल साइटवर शेअर करण्‍यात आले असून शालवर ठिकठिकाणी 'एनएम' प्रिंट केले असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जानेवारीमध्ये भारताचा दौरा केला होता. यावेळी मोदींनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत नरेंद्र मोदींनी आपले नाव असलेला प्रिंटिंग सूट परिधान केला होता.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह 'आप'चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महागडा सूट परिधान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका केली होती.

Pawan Khera ‏@Pawankhera ने केलेले ट्वीट- ''लुइस व्हितान यांची शाल परिधान करून काय मोदी फ्रान्समध्ये 'मेक इन इंडिया'चा प्रचार करत आहेत काय?''

Asad #KisaanRally ‏@Asadkurwai ने केलेले ट्वीट - ''देशाच्या सीमेवर असलेले जवान शहीद झाले चालतील, शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या तरी चालतील, परंतु मी महागडे सूट आणि शाल परिधान करतच राहिल''

@rtdravid ने केलेले ट्वीट- ''मोदींनी करायचे तेच केले. यावेळी तर त्यांनी स्वत:चे नाव असलेली शाल परिधान केली. मोदींना ही शाल कोणी दिली याचा शोध घेतला पाहिजे.''
मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांनी भेट दिली पेंटिंग...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सच्या‍ राष्ट्राध्यक्षांना 'ट्री ऑफ लाइफ' शीर्षक असलेले एक पेंटिंग भेट दिले. या पेंटींगच्या माध्यमातून मोदींनी भारतातील विविधता आणि परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या डिसेंबरमध्ये फ्रान्समधील यूएन फ्रेमवर्क कंव्हेशनच्या धर्तीवर कॉन्फ्रेरन्स ऑफ पार्टी मीटिंग होणार आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, सोशल साइटवर शेअर झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शालचे फोटो...