आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३९ वर्षीय मॅक्रोन ठरले फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष; उजव्या विचारसरणीला जनतेचा नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयानंतर समर्थकांना संबोधित करताना मॅक्रोन - Divya Marathi
विजयानंतर समर्थकांना संबोधित करताना मॅक्रोन
पॅरिस - राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कट्टर उजव्या विचारसरणीच्या उमेदवार मरीन ली पेन यांना नकारत फ्रान्सच्या जनतेने इमॅन्युएल मॅक्रोन यांना आपले नवे राष्ट्राध्यक्ष निवडले आहे. 39 वर्षीय मॅक्रोन फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात युवा राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. इमेन्युएल यांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
मतपत्रिकेच्या माध्यमातून झाले मतदान
मतपत्रिकांच्या माध्यमातून झालेल्या या मतदानात मॅक्रोन यांना तब्बल ६५.५ टक्के मते मिळाली आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या पक्षाचे उमेदवार पहिल्या फेरीतच बाद झाले. युरोपातील जर्मनीनंतरची दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या फ्रान्समध्ये मॅक्रोन विजयी व्हावेत, अशी युरोपातील बहुतांश लोकांची इच्छा होती. देशातील बेरोजगारी हे मॅक्रोन यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.
 
भारतातूनही मतदान
पुद्दुचेरीतून मतदान - फ्रान्सच्या वसाहती ज्या भागात होत्या, त्या ठिकाणीही मतदान झाले. यात भारताच्या पुद्दुचेरीचा समावेश होता. येथे ४६०० मतदार होते. कराईकल, चेन्नईमध्येही मतदानकेंद्र उभारण्यात आले होते.
 
उजव्या विचारसरणीला जनतेचा नकार
राष्ट्राध्यक्ष पदासाठी सर्वात महत्वाकांक्षी राहिलेल्या मरीन ली पेन यांचा मॅक्रोन यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत तेथील जनतेने उजव्या विचारसरणीला दिलेला कौल आपल्याला सुद्धा मिळेल अशी महत्वाकांक्षा ली पेन यांनी बाळगली होती. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात चक्क देशभरातील मशीदी बंद पाडण्याचे आश्वासन दिले होते. केवळ मुस्लिमच नव्हे, तर ज्यू समुदायाकडून सुद्धा ली पेन यांना विरोध होता. एवढेच नाही, त्यांच्या वडिलांनी सुद्धा आपली मुलगी राष्ट्राध्यक्ष पदाच्या लायकीची नाही असे वक्तव्य केले.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा... 17 वर्षाचे असताना शिक्षिकेच्या प्रेमात पडले होते मॅक्रोन... आणि विजयोत्सवाची दृश्ये...
बातम्या आणखी आहेत...