आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • France : Presidential Elections, Daughter Father Fight

फ्रान्स: राष्ट्राध्यक्षपद निवडणूक, कन्या-पिता आमनेसामने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - बहुतांश देशांमध्ये वडील आपल्या मुलाला वा मुलीला राजकीय वारसदार म्हणून समोर आणतात. आई -वडिलांकडून आपोआपच वारसांना ते पद मिळण्याच्या घटनाही सार्वत्रिक आहेत. मात्र, फ्रान्समध्ये याच्या विपरीत घडले. वडिलांनी स्थापन केलेल्या पार्टीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुलीनेच पार्टीच्या इतर सदस्यांसोबत मिळून पित्याला निलंबित केले. यावर कडी म्हणजे वडिलांनी मुलीवर पलटवार केला. २०१७ मध्ये होणा-या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुलीचा पराभव झाला तर उत्तमच, अशी टिप्पणी पित्याने केली आहे. फ्रान्सच्या ले पें या परिवारात ही सत्तेची रस्सीखेच सुरू आहे.

ज्यां मेरी ले पें (८६) यांनी १९७२ मध्ये नॅशनल फ्रंट (एनएफ) या पक्षाची स्थापना केली होती. २०११ पर्यंत ते पार्टी प्रमुखपदी होते. आता त्यांची कन्या मॅरीन ले पें हिला पार्टीवर एकहाती वर्चस्व हवे आहे. पित्याला ती राजकारणापासून दूर ठेवू इच्छिते. ज्यां-मेरी यांच्या सातत्याने येणा-या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पार्टीची प्रतिमा खराब होत असल्याने मॅरीन यांनी पित्याने राजकारणापासून दूर राहावे, अशी भूमिका घेतली आहे. ज्यां-मेरी यांची वक्तव्ये एनएफ पार्टीची वक्तव्ये समजू नयेत, असा खुलासा मॅरीन यांनी केला आहे. यहुदींच्या हत्याकांडाची ऐतिहासिक घटना होलोकास्ट ही माझ्यासाठी जुजबी घटना आहे, असे ज्यां-मेरी यांनी म्हटले आहे. त्यामुळे नॅशनल फ्रंटवर यहुदी समाजाने नाराजी व्यक्त केली. पार्टीच्या कार्यकारी समितीने रविवारी ज्यां-मेरी यांना प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मॅरीन होत्या. संस्थापक असल्याने ज्यां-मेरी पार्टीचे मानद अध्यक्ष आहेत. २०११ मध्ये पार्टी अध्यक्षपदाची सूत्र मॅरीन यांनी स्वीकारली होती. मुलीने नाव बदलावे- मॅरीन माझी मुलगी आहे. असून ती पार्टीची अध्यक्ष आहे. तिने माझे नाव लावणे मला पसंत नाही. तिने लग्न करून नाव बदलावे. मला तिला स्वत:ची मुलगी म्हणण्याची लाज वाटते. मंगळवारी युरोप १ रेडिआेला दिलेल्या मुलाखतीत पित्याने नाराजी व्यक्त केली.

ज्यां-मेरी ले पें
१९२८ मध्ये त्यांचा जन्म झाला. फ्रान्सच्या राष्ट्रपतिपदासाठी ५ वेळा त्यांनी निवडणुका लढवल्या. १९५६ ते १९६२ आणि १९८६ ते १९८८ पर्यंत फ्रान्सचे संसद सदस्य होते. युरोपीय संसदेत फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

राजकारणावर परिणाम
२०१७ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मॅरीन दुस-या स्थानी राहतील. मात्र, त्यांचा विजय शक्य नसल्याचे निवडणूकपूर्व चाचणीत म्हटले आहे. ज्यां-मेरी ले पें यांना पार्टीतून काढल्याने त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज लावणे शक्य नाही. मात्र, पार्टीत दोन तट होणार, हे निश्चित.