आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रान्सचे राष्ट्रपती सरकोझी निवडणुकीतून बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - फ्रान्सच्या राष्ट्रपतिपदासाठी डाव्या रिपब्लिकन पक्षात तिकीट मिळविण्याची भाऊगर्दी झाली असून, रविवारी अमेरिकी राष्ट्रपती निवडणुकीच्या धर्तीवर येथे झालेल्या प्राथमिक फेरीत माजी राष्ट्रपती निकोलस सरकोझी तिसऱ्या स्थानावर राहिले आणि त्यामुळे ते आता या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. आता या शर्यतीत फ्रान्सचे दोन माजी पंतप्रधान अॅले जुप आणि फ्रान्स्वा फियान मैदानात उरले आहेत.

सरकोझींनी आपला पराभव मान्य करत या फेरीत पहिल्या क्रमांकावर असलेले फ्रान्स्वा फियान यांना समर्थन, पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, सत्ताधारी सोशॅलिस्ट पक्षाची लोकप्रियता घटत चालली आहे. यानुसार एप्रिल मे मध्ये होणाऱ्या रन ऑफ मे मध्ये त्यांच्या कोणत्या उमेदवाराच्या जिंकण्याची शक्यता कमीच आहे. राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद निवडणूक लढवू शकतात. पण पक्ष कोणाला तिकीट देईल हे पुढील वर्षी म्हणजे जानेवारीत पार्टी प्रायमरीतच ठरेल.
बातम्या आणखी आहेत...