जोहान्सबर्ग - महात्मा गांधी यांच्या पणतीवर दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन व्यावसायिकांबरोबर फ्रॉड केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 45 वर्षीय आशीष लता रामगोबिन हिला चोरी, फ्रॉड आणि फसवणुकीच्या आरोपात सोमवारी डर्बन येथील कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना 2 लाखांच्या मुचलक्यावर जामीन देण्यात आला.
आशीष लता यांनी दोन स्थानिक व्यावसायिकांबरोबर 8,30,000 डॉलर (सुमारे 5 कोटी) च्या फ्रॉडचा आरोप केला आहे. नेटकेयर ग्रुपच्या प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी भारतातून बेडिंग मागवण्याचे टेंडर त्यांना मिळाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एलीट फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन युनिटचे ब्रिगेडियर हँगवानी मुलूदजी यांच्यानुसार आशीष लताने इनव्हेस्टर्सना राजी करण्यासाठी खोटे बिल आणि कागदपत्र सादर केले होते. लता ने इनव्हेस्टर्सला हेही सांगितले की, लिननचे तीन कंटेनर्स भारतात पाठवण्यात आले आहेत.
एस. आर. महाराज नामाच्या एका व्यावसायिकाने प्रॉफिट शेअरच्या मोबदल्यात आशीष लताला सुमारे 3 कोटी रुपये दिले. महाराजने त्यासाठी सामानाची इंपोर्ट आणि कस्टम ड्युटीही क्लिअर करून दिली होती. दुसऱ्या एका व्यावसायिकाने आशीष लताला 2 कोटी 80 लाख रुपये दिले होते, असा दावा केला आहे.
आशीष लता प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते आणि अॅला गांधी आणि मेवा रामगोबिंद यांची मुलगी आहे.