आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French Authorities Increased Speed Of Investigation

पॅरिस अटॅक : मास्टरमाइंडची ओळख पटली, फ्रान्‍समध्‍ये 104 जण नजरकैदेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी पॅरिसमध्ये शोकसभा आयोजित केली होती. यावेळी फायरिंगची अफवा उडाल्याने लोकांनी फुले चिरडत त्याठिकाणाहून पळ काढला. - Divya Marathi
रविवारी पॅरिसमध्ये शोकसभा आयोजित केली होती. यावेळी फायरिंगची अफवा उडाल्याने लोकांनी फुले चिरडत त्याठिकाणाहून पळ काढला.
पॅरिस - फ्रान्सने पॅरिस दहशतवादी हल्‍ल्याप्रकरणी 104 जणांना नजरकैद केले आहे. फ्रान्सच्‍या गृह मंत्रालयाने माहिती दिली की, या हल्‍ल्यानंतर देशभरात आतापर्यंत 168 ठिकाणी छापे मारण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी 23 जणांना अटक करण्‍यात आले आहे. बेल्‍जियममध्‍ये राहणारा अब्देलहामिद अबऔद हा या हल्‍ल्याचा मास्टरमाइंड असल्‍याची माहिती समोर आली आहे. इतर दोन हल्‍लेखोरांची ओळख पटली आहे. यापैकी एक सीरिया आणि दुसरा फ्रान्सचा आहे.
हल्ल्यातील मृतांसाठी आयोजित शोकसभेदरम्यान एक अलार्म वाजताच फायरिंगच्या अफवेमुळे गोंधळ उडाला. श्रद्धांजलीसाठी ठेवलेली फुले आणि मेणबत्त्या चिरडत लोकांनी त्याठिकाणाहून पळ काढला.
अफवेमुळे पसरला गोंधळ
> रविवारी रात्री पॅरिसच्या द ला रिपब्लिकमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
> लोकांनी खोट्या अलार्मचा आवाज गोळ्यांचा आवाज अशल्याचे समजले आणि एकच गोंधळ उडाला.
> प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अलार्मचा आवाज येताच लोक इकडून तिकडे पळू लागले.
> श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणलेली फुले पायाखाली तुडवत लोक पळू लागले.
> पोलिसांनी नंतर ही जागा रिकामी केली आणि लोकांना अलार्म खोटा असल्याचे सांगितले.

बेल्जियमकडून फ्रान्सची मदत
> पॅरिस हल्ल्यातील आठव्या हल्लेखोराला पकडण्यासाठी सुरक्षा संस्थांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नोटीस जारी केली आहे. यासाठी बेल्जियमला फ्रान्सला पूर्ण मदत करत आहे.
> बेल्जियमचे अधिकारी म्हणाले की, तीन आरोपींपैकी एक भाऊ क्रॉस फायरिंगमध्ये मारला गेला आहे. तर एकाला पोलिसांनी बेल्जियममध्ये अटक केली आहे.
> तिसऱ्या भावाबाबत मात्र अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. त्याचा शोध घेतला जात आहे.
> सुरुवातील आलेल्या वृत्तानुसार सर्व 8 हल्लेखोर मारले गेल्याचे समोर आले होते. पण रविवारी पॅरिसमध्ये पोलिस म्हणाले की, 6 हल्लेखोरांनी स्वतःला उडवले होते.
> तर एकाला पोलिसांनी शूट केले होते. आठव्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान फ्रान्मध्ये पोलिसांनी नागरिकांना अलर्ट केले आहे. संशयिताबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित महत्त्वाच्या अशा 5 बाबी...