आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French PM Warns Say, Risk Of Chemical, Biological Attack

फ्रान्सला रासायनिक, जैविक हल्ल्यांचा धोका, पंतप्रधान वॉल्स यांचा संसदेत इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- फ्रान्सला आगामी काळात रासायनिक किंवा जैविक हल्ल्यांचा धोका असल्याचा गंभीर इशारा पंतप्रधान मॅन्युएल वॉल्स यांनी दिला आहे. पॅरिसवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीची मुदत वाढवण्याबाबत खासदारांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हा इशारा दिला.

आता कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही, असे स्पष्ट करून फ्रान्सने या दृष्टीने दक्षता बाळगण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती वॉल्स यांनी दिली. सध्या संपूर्ण युरोपात संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू असून ताब्यात घेतलेल्या इसमांची कसून चौकशी सुरू आहे. या संदर्भात युराेपीयन युनियनच्या पदाधिका ऱ्यांशी वॉल्स यांनी नुकतीच चर्चा केली असून या देशांतील विमान प्रवाशांबद्दलच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

युरोपातील देशांनी एकत्रितपणे दक्षता बाळगून दहशतवाद्यांचा बिमोड करण्याची हीच खरी वेळ असल्याचे वॉल्स यांनी म्हटले आहे. दहशतवादी पोलिस किंवा कोणत्याही वेशात घुसू शकतात. याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. आणीबाणीला मुदतवाढ देण्यासंदर्भाचे विधेयक वॉल्स यांनी संसदेत मांडले असून शुक्रवारी ते वरिष्ठ सभागृहात मांडले जाणार आहे. त्यानंतर यावर निर्णय होऊ शकेल.

लढाईत कॅनडा अमेरिकेच्या सोबत
कॅनडातील नवनियुक्त पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत कॅनडा कायम अमेरिकेसोबत असल्याचे म्हटले आहे. इस्लामिक स्टेटविरुद्धच्या लढाईत कॅनडा कधीही माघार घेणार नाही, अशी इमी ट्रुडा यांनी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना गुरुवारी दिली. दोन्ही देशांच्या नेत्यांची ही पहिलीच अधिकृत भेट होती. त्यामुळे त्याला महत्त्व आले.

टीका चुकीची : बेल्जियमची भूमिका
पॅरिसवर झालेल्या हल्ल्यांतील दहशतवाद्यांपैकी पाच जण बेल्जियममधील रहिवासी होते. या पार्श्वभूमीवर जगभरातून या देशांच्या सुरक्षा यंत्रणांवर टीका झाली. मात्र, पंतप्रधान चार्लस मायकेल यांनी ही टीका चुकीची असल्याचे म्हटले आहे. संसदेत बोलताना त्यांनी देशातील सुरक्षा यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचा दावा केला. उलट फ्रेंच सैनिकांनी हल्ल्यानंतर केलेल्या कारवाईसाठी बेल्जियमने पुरवलेली गुप्त माहिती महत्त्वाची ठरली व दोन अतिरेकी मारले गेल्याचे ते म्हणाले. अागामी काळात आणखी माहिती पुरवली जाईल, अशी हमी पण
त्यांनी दिली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मास्टरमाइंड मारला गेला