आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका रात्री 50 महिलांना प्रेग्नेंट करणाऱ्या ग्रीक हिरोची \'मर्दानगी\' धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीक पौराणिक कथांचा हा हिरो त्यांच्या पौरुषत्वासाठी ओळखला जातो. त्याच्याबाबत असे म्हटले जाते की त्याच्याबद्दलची महिलांमधील तृष्णा कधीच शमली नाही. मात्र फ्रान्सच्या आहकेसो शहरात या ग्रीक हिरोची 'मर्दानगी' नेहमीच चोरीला जात आहे.

काय आहे प्रकरण
ग्रीक पौराणिक कथांमधील नायक हॅरक्यिलस चा फ्रान्सच्या आहकेसो शहरातील पार्क मोरेस्कमध्ये तीन मीटर उंचीचा पुतळा आहे. 1948 मध्ये येथे हा पुतळा बसविण्यात आला. मात्र काही दिवसांपासून शहरातील टवाळखोर या पुतळ्याचे गुप्तांग चोरून नेत आहेत. येथील प्रशासन या लिंग चोरीमुळे त्रस्त झाले आणि त्यांनी आता असा निर्णय घेतला आहे की या ग्रीक हिरोच्या पुतळ्याला लिंगच नसेल.

जेव्हा कोणी खास व्यक्ती किंवा उत्सव असेल तेव्हाच पुतळ्याला लिंग लावण्यात येईल. आहकेसो शहराचे प्रथम नागरिक - महापौर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, 'पुन्हा असे होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. माझी प्रार्थना आहे की माझ्या शत्रू सोबतही असे होऊ नये. मात्र या पुतळ्यासोबत परत-परत तेच होत आहे.'
शहराचे उपमहापौरही या निर्णयालाच बेस्ट ऑप्शन ठरवत आहेत. ते म्हणाले, 'असे केले नसते तर पुन्हा-पुन्हा या पुतळ्याची चीरफाड करवा लागली असती.'
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोण होता हॅरक्यिलस
बातम्या आणखी आहेत...