आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fresh UK Terror Alert As ISIS Grant British Terrorists 'leave To RETURN HOME'

ब्रिटनमध्ये हल्ल्याचा कट, ७० दहशतवादी सक्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमधील ३५० नागरिकांनी इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सिरियाकडे प्रयाण केल्याचा संशय होता. त्यापैकी ७० दहशतवादी मायदेशी परतले असून ते ब्रिटनच्या विविध भागांत हल्ले करण्याची योजना आखत असल्याचा सुगावा लागला आहे. ब्रिटनच्या गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाचे समन्वयक स्कॉट विल्सन यांनी हा संशय व्यक्त केला आहे. सुरक्षा आणि दहशतवादविरोधी प्रदर्शनात बोलताना स्कॉट यांनी सजगतेचा इशारा दिला असून या मायदेशी परतलेल्या दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे म्हटले आहे.