आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातून फरार माल्या या गावकऱ्यांसाठी बनलाय नायक, वाचा कसा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - भारतातून अब्जावधींचे कर्ज घेऊन फरार घोषित करण्यात आलेला उद्योजक विजय माल्या ब्रिटनच्या एका गावासाठी नायक आहे. लंडनपासून 48 किमी दूर असलेल्या टेविन नामक गावातच माल्या राहत आहे. 17 बँकांकडून 9000 कोटींचे कर्ज घेऊन पसार झालेल्या माल्यावर मनी लॉन्ड्रिंग आणि बनावट पद्धतीने कर्ज काढण्याचे आरोप आहेत. तसेच भारत सरकार त्याच्या प्रत्यर्पणासाठी प्रयत्न करत आहे.

 

यामुळे मानतात हिरो...
> ब्रिटनच्या टेविन येथे 2000 लोकांमध्ये राहणाऱ्या माल्याला एक प्रतिष्ठित आणि आदर्श व्यक्तिमत्व मानतात. तो येथील गावकऱ्यांसाठी त्यांचा नायक आहे. 
> टेविनच्या रोज अॅन्ड क्राऊन पबमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले, की माल्याने या गावातील लोकांना एक ख्रिस्मस ट्री गिफ्ट केले होते. ख्रिस्मस ट्री खरेदी करण्यासाठी गावातील कुणीही पैसे देण्यास तयार नव्हता. अशात माल्याने 16 लाखांचे ट्री गिफ्ट केले. 
> गावातील लोकांसाठी तो एक अतिशय महत्वाची व्यक्ती आहे. आमच्या गावात माल्यासारखी व्यक्ती राहते याचा सर्व गावकऱ्यांना अभिमान वाटतो. या गावातील लोकांना कार रेस आवडते. अशात माल्या फॉर्म्युला वनचा भाग असल्याचे कळाल्यानंतर गावकरी त्याचे फॅन झाले आहेत. 

 

फरार असण्यावर काय म्हणाले गावकरी?
> बार कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, माल्या यापूर्वीही कार शोसाठी या गावात आला होता. त्याला सगळेच फॉर्म्युला वन मॅन म्हणून ओळखतात. सगळ्यांसाठी माल्या आवडती व्यक्ती आहे. कुणीही माल्या विरोधात अपशब्द वापरत नाही.
> माल्या संकटात असल्याचे गावकऱ्यांना माहिती आहे. ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांना समस्या असतातच असे म्हणत गावकरी जास्त विचार करत नाहीत. 
> दुसऱ्या स्थानिकाने म्हटले, सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे, की माल्याचे प्रत्यर्पण कधीच होऊ नये आणि तो याच गावात स्थायिक व्हावा. 
> माल्या येथील पब आणि बारमध्ये येत नाही. तो जेवणासाठी प्लूम या भागात जातो. तेथे दोन वेळचे जेवण 850 रुपयांत मिळते. 
> गावातील एका शेफच्या मते, माल्या अतिशय मनमिळावू आणि जमीनीशी जुळलेला माणूस आहे. तो आपल्या पत्नी आणि मुलासोबत येथेच राहतो. पण, आपण धनाढ्य आहोत असा अहंभाव त्याच्यात बिल्कुल नाही. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, माल्याचे नवे घर आणि या गावातील आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...