आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Future Aeroplane Antipode Could Travel London To New York In 11 Minutes

फ्युचर एअरोप्लेन अँटीपॉड : 11 मिनिटांत कापेल लंडन ते न्यूयॉर्कचे अंतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो.
इंडस्ट्रियल डिझायनर चार्ल्स बॉम्बार्डियर यांनी एका नव्या हायपरसॉनिक जेट 'अँटिपॉड' ची संकल्पना सादर केली आहे. या जेटच्या मदतीने लंडन ते न्यूयॉर्कदरम्यानचे 5566 किलोमीटरचे अंतर अवघ्या 11 मिनिटांत कापणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये 10 पॅसेंजर्स बसू शकतील. याचा वेग ताशी 29,635 किमी असेल.

ही असतील वैशिष्ट्ये...
- या जेटचा वेग सुपरसॉनिक स्क्रीमर एअरक्राफ्टपेक्षा दुप्पट आणि कॉन्कॉर्डच्या तुलनेत 12 पटीने अधिक आहे.
- हे जेट 20 हजार किमीचे अंतर अवघ्या अर्ध्या तासात कापू शकेल.
- या जेटचे विंग्स रॉकेट बूस्टरबरोबर फिट केले जातील.
- त्याच्या मदतीने जेट 40 हजार फूच उंचीवर आणि ताशी 6174 किमी वेगाने उडू शकेल.
- यात स्क्रॅमजेट इंजिन फिट केले जाईल. त्याच्या मदतीने ताशी 14 हजार ते 25 हजार किलोमीटरचा वेग मिळतो.
- स्क्रॅमजेट इंजिन ऑक्सिजनचे मोठ्या टँक ठेवण्याऐवजी वातावरणातील ऑक्सिजनचा वापर करेल.

डिझायनर चार्ल्स बॉम्बर्डियर
- इंडस्ट्रियल डिझायनर चार्ल्स कॅनडाची एअरक्राफ्ट कंपनी बॉम्बर्डियर इंकशी संलग्न आहेत.
- त्यांनी भारताचे डिझाइन लॅब 'लुनाटिक कॉनसेप्ट'चे फााऊंडर अभिषेक रॉय यांच्या मदतीने या जेटची संकल्पना तयार केली आहे.
- गेल्यावर्षी चार्ल्स यांनीच एअरक्राफ्ट स्क्रीमरचे डिझाइन तयार केले होते.
- चार विंग असलेल्या स्क्रॅमजेटमध्ये ताशी 12,348 किमी वेगासह 75 प्रवाशांची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला होता.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित PHOTOS