आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यातील स्मार्ट घर बनवण्याचा कल्पना उद्योग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या मॅनहॅ‌टन, न्यूूयॉर्कमध्ये एका वेअरहाऊसमध्ये जवळपास २०० लोक अाविष्कारांचा खेळ पाहत आहेत. स्टेजवरून २८ वर्षीय उद्योजक बेन कॉफमॅन लोकांनी ऑनलाइन पाठविलेल्या उत्पादनाच्या कल्पनांची यादी वाचून दाखवतात. त्यापैकी अधिक कल्पना रद्द होतात. अचानक लोकांचा मूड बदलतो. स्क्रीनवर घरात कँडी बनवणारा डिस्पेंसर दिसतो. तो स्वयंचलित पध्दतीने काम करतो. लोक काही प्रश्न विचारतात. शेवटी कॉफमॅन मतदान करतात. मतामोजणीनंतर डिस्पेंसरचा विचार सादर करणारे फ्लफी यांना (खरे नाव- रॉय जॉनसन) क्विर्कीचे संशोधक घोषित करण्यात येते.
क्विर्की एक अाविष्कारकेंद्रित सोशल नेटवर्किंग साइट आहे. याद्वारे सामान्य घरगुती वस्तू तयार आणि विक्री केल्या जातात. वापरकर्तेच त्याच्या कल्पना मांडतात. दर आठवड्याला हजारो लोक अशा कल्पना आणि त्याचे फोटो पाठवतात.त्यानंतर साइटचे दहा लाखांपेक्षा जास्त सदस्य त्या उत्पादनाची उपयोगिता, तिचा आकार आणि नावाबाबत उत्तर देतात. ज्या उत्पादनाला हिरवा कंदील मिळतो त्या उत्पादनावर क्लिर्कीचे इंजिनिअर काम सुरू करतात. सर्व काही ठीक झाल्यानंतर ते उत्पादन बाजारात येते.
क्विर्कीचे कार्यकारी अधिकारी कॉफमॅन म्हणतात, ज्यांच्याजवळ चांगल्या कल्पना आहेत अशांसोबत आम्ही आहोत. २००९मध्ये क्विर्कीच्या स्थापनेपासून डझनभर भव्य उत्पादने बाजारात आली. त्यात, दुमडता येणारी पॉवर स्ट्रिप आणि रंगीत डेस्कटॉप केबल ऑर्गनायजर (कॉर्डी) यांचा समावेश आहे. दोन्ही उत्पादनांचा दहा लाखांपेक्षा जास्त खप झाला आहे. त्यांच्या मूळ उत्पादकांना सहाआकडी पैसे मिळाले आहेत. क्विर्की आपल्या उत्पादनाचा काही भाग त्यांना देते. क्विर्कीसारखे सामान अमेरिकेतील वाॅल मार्ट, बेस्ट बाय व होम डेपोसह वीस हजारांपेक्षा अधिक किरकोळ दुकानात िवक्रीस आहेत. गेल्या वर्षी पाच कोटीपेक्षा जास्त डॉलरची विक्री झाली.
क्विर्की फर्मने एप्रिलमध्ये खेळण्या बनवणारी प्रसिद्ध कंपनी माटेलसोबत करार केला. ते अमेच्योर आविष्कार आणि हरमन ऑडिओ, जीईसारखे मुख्य ब्रँडदरम्यान मैत्रीपूर्व संबंधांना प्रोत्साहन देते. ग्राहकांना त्यामुळे भरपूर फायदा िमळताे. घरगुती उत्पादन बनविण्यासाठी उपयोगी मार्ग सांगू शकतील, अशा हजारो विचारकर्त्यांची सेवा क्विर्कीसोबत भागीदारी करणाऱ्या कंपन्यांनाही मिळते.
कॉफमॅनने २००५मध्ये आई-वडिलांचे घर गहाण ठेवून आयपॉडचे सुटे भाग बनविणारी कंपनी मार्फीची सुरुवात केली होती. मात्र, व्यापारातील आव्हाने पाहता २००७मध्ये कंपनी विकली. दोन वर्षांनंतर क्विर्की अस्तित्वात आली. उत्पादनाचा निर्माता, विक्रेता आणि प्रचारक या नात्याने कंपनीला नुकसानही सोसावे लागते. त्याने ब्लू टूथ स्पीकर आणि फोन चार्जिंग स्टेशनसारख्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. तरी ग्राहकांना ते पसंत पडले नाही. त्याला घरगुती सामान बनवणाऱ्या कंपन्यांशी झगडत स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे लागले.
दुसऱ्यांकडून पैसे जोडणे कठीण आहे.कॉफमॅन व त्यांच्या चमूला उत्पादनाच्या दहा टक्के मूल्य संशोधकाला देण्याची पद्धत बंद करावी लागली. आता ते पाच टक्के किंवा कमी पैसे देतात. भागीदाराला कल्पना मान्य नसेल तर काम होत नाही. दुसरीकडे क्विर्कीचे म्हणणे आहे, ते स्वत:चे स्वातंत्र्य सोडत नाही. कनेक्टेड डिव्हाइसमध्ये पैसे लावण्याची त्यांची याेजना आहे.