आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

G-20: नॉर्वेला गुंतवणुकीचे आवतण, नॉर्वेच्या पंतप्रधानांनी मोदींना दिली फुटबॉलची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिरंतन विकासाचे प्रतिक म्हणून सोलबर्ग यांनी फुटबॉल भेट दिला. - Divya Marathi
चिरंतन विकासाचे प्रतिक म्हणून सोलबर्ग यांनी फुटबॉल भेट दिला.
हॅम्बर्ग- जी-२०परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. नॉर्वेला राष्ट्रीय गुंतवणूक पायाभूत क्षेत्रात फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे आवतण देण्यात आली. उभय नेत्यांत अत्यंत मैत्रीपूर्ण चर्चा झाली. सोलबर्ग यांनी मोदींना प्रतीकात्मक फुटबॉलची भेट दिली.
 
माेंदींनी शनिवारी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन इटलीचे पंतप्रधान पाआेलो गेंटिलोनी यांच्याशीदेखील चर्चा केली. त्याशिवाय मोदी अर्जेंटिनाचे अध्यक्ष मॉरिसिआे मॅक्री यांच्यातही द्विपक्षीय चर्चा झाली. अर्जेंटिनातील विजयाबद्दल मोदींनी मॅक्री यांचे अभिनंदन केले. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांच्या अभिनंदनाच्या फोनचे स्मरण करून दिले. त्याचबरोबर कोरियन भाषेतून केलेल्या ट्विटचीही बैठकीदरम्यान आठवण काढली.

उभय नेत्यांनी राजनयिक भागीदारीबद्दल सहमती दर्शवली. त्याचबरोबर मेक इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडियासारख्या योजनांनादेखील राष्ट्रप्रमुखांनी पाठिंबा दिला. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मून यांना भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले. मून यांनी भारत भेटीचे निमंत्रण स्वीकारले. इटलीसोबत व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात सहकार्यवाढीवर भर देण्यात आला आहे. इटलीने भारताच्या वर्ल्ड फूड इंडिया मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मोदींनी केले. दरम्यान, मोदींनी शुक्रवारी जपानचे शिंजो अॅबे आणि कॅनडाचे जस्टीन ट्रॉड्यू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली होती.
 
ट्रम्प-मोदींची ‘उत्स्फूर्त’ भेट
जी-२०च्या सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांमध्ये शुक्रवारपासून सातत्याने चर्चा सुरू आहे. त्यात व्यापारापासून दहशतवाद आणि वातावरण बदलापर्यंतच्या सर्व विषयांचा समावेश होता. त्याच वेळी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या खुर्चीवरून उठून मोदींना भेटण्यासाठी गेले. त्यांच्यात उत्स्फूर्तपणे संभाषण झाले. शनिवारी परिषदेचा दुसरा दिवस होता. चर्चेच्या सत्राची सुरुवात होताच ट्रम्प यांनी मोदींची अशी भेट घेऊन सर्वांचेच लक्ष वेधले, अशी माहिती अरविंद पनगरिया यांनी दिली.
 
फर्स्ट लेडी मेलानिया आल्यानंतरही ट्रम्प-पुतीन चर्चा सुरूच..
डोनाल्डट्रम्प- व्लादीमिर पुतीन यांच्यातील चर्चेमुळे जी-२० ची बैठक चांगलीच गाजली. दोन्ही नेते पहिल्यांदाच शुक्रवारी भेटले. ही बैठक अर्ध्या तासासाठी ठरली होती. परंतु ती बराच वेळ चालली. कोणीही बैठक आटोपण्यास तयार नव्हते. त्यामुळे फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना त्यांच्या दोघांत पाठवण्यात आले होते. पण त्यातही यश आले नाही. मेलानिया आल्यानंतरही ही चर्चा तासभर चालली. अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला का ? या ट्रम्प यांच्या प्रश्नावर पुतीन यांनी या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. निवडणुकीनंतर विरोधी गटाने या मुद्द्यावरून ट्रम्प यांच्यावर टीकेचे झोड उठवली होती.
 
बातम्या आणखी आहेत...