आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तच्या अलेक्झांड्रियात गरब्याची धमाल, भारतीय वंशाच्या समुदायाकडून दसरा साजरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो - भारतीय सणोत्सव आता सातासमुद्रापारही साजरे होऊ लागले आहेत. इजिप्तच्या काही शहरांत यानिमित्ताने भारतीय लोकांनी पारंपरिक वेशात एकत्र येऊन गरब्याचा आनंद घेतला.
अलेक्झांड्रिया, पोर्ट सेड, इस्मेलिया या शहरांतून राजधानी दाखल झालेल्या सुमारे ६०० हून अधिक स्त्री-पुरुषांनी त्यात सहभाग घेतला होता. साडी, घागरा-चोळी, कुर्ता आणि चुडीदार असा अस्सल भारतीय पोशाखात एका तालात संगीत-नृत्यात मग्न झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मौलाना आझाद सेंटर फॉर इंडियन कल्चर (एमएसीआयसी), कैरोच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही देशातील लोक तसेच संस्कृतीमध्ये नवे स्नेहबंध निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. दरम्यान, अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या देशांतदेखील भारतीय लोक सण उत्सव साजरे करतात.

संस्कृती जगण्याची संधी
परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना मूळ संस्कृती जपण्याची, तिला उजाळा देण्याची संधी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते. त्याचबरोबर अशा माध्यमातून परंपरा, संस्कृतीचे दर्शनही घडते. नागरिकांमध्ये संवादही वाढू लागतो.

विजयाचे प्रतीक
वाईट प्रवृत्तीवरील चांगल्या प्रवत्तीचा विजयाचे प्रतीक म्हणून भारतात दसरा किंवा विजयादशमी साजरी केली जाते. त्याचबरोबर महिषासुराचा दुर्गामातेने वध केला होता. त्याचे पौराणिक दाखले मिळतात. नेपाळमध्येही अशा विजयादशमी साजरी केली जाते.

परदेशींना ओळख
परदेशातील नागरिकांना भारतीय संस्कृतीची ओळखही अशा कार्यक्रमातून होते. त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे या वेळी बोलताना संजय भट्टाचार्य यांनी सांगितले.

माँ दुर्गेची आरती पवित्र वातावरण
राजदूत संजय भट्टाचार्य यांनी इजिप्तच्या जनतेचे कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत केले. राजदूत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात माँ दुर्गेच्या आरतीने झाली. यानिमित्ताने दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता.
बातम्या आणखी आहेत...