आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gas, Carosin, Bio Fuel Will Be Used In Plain In Future

गॅस, केरोसीन, बायो फ्युएलने चालणार हायब्रीड विमान, एका वेळी १४ हजार किमीचे उड्डाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डच एअरलाइन्स केएलएम आणि डेल्फ्ट टेक्नोलॉजी युनिव्हर्सिटीने अनेक प्रकारच्या इंधनाद्वारे चालणाऱ्या हायब्रीड विमानाच्या तंत्रज्ञानाचा खुलासा केला आहे. याविमानाला अॅडव्हास्ड हायब्रीड इंजीन एअरक्राफ्ट डेव्हलपमेंट (AHEAD) नाव देण्यात आले.
- हे विमान इंधन खर्ची करण्याच्या दोन पद्धती वापरेल. एक, क्रायोजेनिक हायड्रोजन किंवा स्वच्छ नैसर्गिक गॅसचा वापर. दुसरे, केरोसिन किंवा बायोफ्युएलचा वापर.
मिश्रित इंधनाने कार्बन उत्सर्जन कमी होईल.
- पंखांच्या डिझाइनमुळे विमानाच्या मागील भाग कमी प्रमाणात खेचला जाईल. उड्डाणादरम्यान कमी इंधन लागेल. इंजीन अशा जागी लावण्यात येईल जेथे विमानातून
निघणारा आवाज हवेत जाईल.
- केएलएमचे लक्ष्य AHEAD सारखे विमान २०५० पर्यंत उडवण्याचे आहे. ३०० प्रवाशांना दोनदा इंधन भरल्याशिवाय १४ हजार किलोमीटरपेक्षा जास्त दूर नेईल.