आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जपानमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘गिशा’चा पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानमधील अत्यंत प्राचीन नगर म्हणून ओळख असलेल्या क्योटोमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘गिशा’ ‘मायको’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणींनी पुढाकार घेतला आहे. राजधानी टोकियोमध्ये आयोजित समारंभात नृत्यकला सादर करण्यासाठी सुमारे ४० गिशा तरुणी पारंपरिक किमोनो पोशाख विशिष्ट केशभूषा करून बुलेट ट्रेनने क्योटोहून टोकियोला पोहोचल्या.

गिशा आहेत कोण?
गिशा किंवा मायको म्हणजे पारंपरिक वस्त्र परिधान करून नृत्य, गायन संगीताच्या तालावर लोकांचे मनोरंजन करणाऱ्या तरुणी आहेत. प्रत्येक गिशाच्या जीवनात पाच टप्पे असतात. या प्रत्येक टप्प्यात त्यांची वेशभूषा, केशरचना वेगवेगळी असते. ही जपानमधील हजारो वर्षांपूर्वीची परंपरा असून पूर्वी केवळ राजघराण्यातील लोकांचे या गिशा मनोरंजन करत. आता सामान्य लोकांचेही मनोरंजन व्हावे म्हणून कार्यक्रम आयोजित केले जातात.
पुढे पाहा, संबंधित छायाचित्रे....