7 मे 1945 रोजी नाझी लष्कराच्या अत्याचारांचा अखेरचा दिवस होता. सहा वर्षांच्या प्रदीर्घ युद्धानंतर नाझी लष्कराने शरणागती पत्करली होती. युरोपिय देशांसमोर जर्मन लष्कराने आत्मसमर्पण केल्यानंतर दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.
फ्रान्सच्या रेम्समध्ये 7 मे रोजी जर्मन लष्कराने आत्मसमर्पणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. त्यानंतर सायंकाळी युरोपिय देशांच्या माहिती विभागाने युद्ध संपल्याचे जाहीर केले. या कागदपत्रांवर अंतिम मोहोर 8 मे रोजी बर्लिनमध्ये लागली. त्यानंतर याच दिवशी लंडन, वॉशिंग्टन आणि मॉस्को या शहरांमध्येही युद्ध संपल्याचे जाहीर करण्यात आले.
युद्ध संपल्याचा जर्मनीतील लोकांसह अनेक देशांना आनंद झाला होता. जर्मनीत अनेक वर्षांपासून सुरु झालेल्या हुकूमशाहीचा शेवट झाला होता. या हुकूमशाहीची सर्वाधिक झळ यहुदिंना बसली होती. लाखो यहुदी हिटलरशाहीच मारले गेले होते. येथील छळ छावण्या आजही या छळाचे प्रतिक आहेत.
आता या छळ छावण्यांचे रुपांतर म्युझिअममध्ये करण्यात आले आहे. आज आम्ही
आपल्यासाठी घेऊन आलोय ऑशविच छळ छावणीचे फोटो. यातून तुम्हाला यात झालेले अनन्वीत अत्याचार दिसून येतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या छळ छावणीचे अंगावर काटा आणणारे फोटो...