आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रावर 66 वार करूनही तो थांबला नाही, रक्त सुद्धा पिले; कारण तेवढेच धक्कादायक!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - 16 वर्षांपूर्वी मित्राचा खून करून चर्चेत आलेला जर्मनीचा वॅम्पायर किलर डॅनियल रूडा लवकरच तुरुंगातून सुटणार आहे. डॅनियलने आपल्या पत्नीसोबत मिळून आपलाच मित्र फ्रँक हेकर्टवर चाकूने 66 वार केले होते. एवढे करूनही तो थांबला नाही. यानंतर पती-पत्नीने फ्रँकचे रक्त पिले होते. तोच नराधम डॅनियल शिक्षा पूर्ण करून बाहेर येत आहे.
 

वॅम्पायर होण्यासाठी सैतानाला दिला होता नरबळी
- स्वतःला वॅम्पायर म्हणणाऱ्या डॅनियलने 2001 मध्ये वाइफ मॅन्युएलासोबत मिळून आपलाच मित्र फ्रँक (33) चा खून केला. 
- डॅनियलने बोशम येथील घरात फ्रँकला एका ताबूतमध्ये बंद केले होते. यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने सलग 66 वार केले.  हत्येनंतर दोघांनी त्याचे रक्त देखील पिले होते. 
- दोघांनी हा खून सैतानला नरबळी देण्यासाठी केल्याचे मान्य केले होते. कित्येक वर्षे चाललेल्या या खटल्यात जर्मनीमध्ये सुरू असलेल्या सैतानाला मानणाऱ्यांचा वर्ग (Satanism) समोर आला होता. 
 

कोर्टात काय म्हणाले?
- कोर्टात दिलेल्या कबुली जबाबात त्या दोन्ही आरोपींनी सैतानाला प्रसन्न करण्यासाठी तसेच वॅम्पायर होण्यासाठी इंगलंड आणि स्कॉटलँडच्या कब्रस्तानांमध्ये कित्येक रात्री काढल्याचे म्हटले होते. 
- जर्मनीसह इतर देशांमध्ये सैतानाला मानणारा मोठा वर्ग आहे. सैतानाला प्रसन्न करण्यासाठी कित्येक पार्ट्या केल्या जातात. त्या पार्ट्यांमध्ये आपण दोघेही जात होते असे त्यांनी मान्य केले होते. 
 
 
सोडल्यानंतर नवी ओळख...
- कोर्टाने या प्रकरणी डॅनियलला 16 आणि मॅन्युएला हिला 13 वर्षांची कैद सुनावली होती. त्या दोघांनाही जर्मनीच्या डॉर्टमंड जेलमध्ये कैद करण्यात आले होते. 
- मॅन्युएला शिक्षा पूर्ण करून बाहेर सुटली. तिला नवी ओळख देऊन आणि डॅनियलपासून दूर करण्यात आले आहे. 
- डॅनियलने सुद्धा आपली शिक्षा पूर्ण केली आहे. तो लवकरच तुरुंगाबाहेर येणार आहे.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, डॅनियल आणि मॅन्युएलाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...