आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१३ मुलांच्या आईला ६५ व्या वर्षी ४ मुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - आधीच तेरा मुलांची आई असलेल्या एका ६५ वर्षीय जर्मन महिलेने युक्रेनमध्ये कृत्रिम गर्भधारणेद्वारे शनिवारी एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला. या चार बाळांपैकी तीन मुले व एक मुलगी असून २६ व्या आठवड्यातच बर्लिनच्या रुग्णालयात त्यांचा अकाली जन्म झाला आहे.

बर्लिनच्या अ‍ॅनीग्रेट रॉनिग्क या इंग्रजी व रशियन भाषेच्या शिक्षिका आहेत. सध्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अ‍ॅनीग्रेट यांना १३ मुले आहेत. त्यांना ७ नातूही आहेत.

युक्रेनमध्ये कृत्रिम गर्भाधान प्रक्रिया केल्यानंतर अ‍ॅनीग्रेट गरोदर राहिल्या. आपल्या नऊ वर्षांच्या छोट्या मुलीला लहान भाऊ किंवा बहीण हवी होती म्हणून आपण बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला, असे अ‍ॅनीग्रेट सांगतात.

एकच हवे होते पण...
सुरुवातीला मला एकच मूल हवे होते. काहीही नियोजन केले नव्हते. मात्र नंतर उत्स्फूर्तपणे घटना घडत गेल्या. मुले मला तरुण ठेवतात.- अ‍ॅनीग्रेट रॉनिंग्क
बातम्या आणखी आहेत...