आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉल्ट डिस्नेवर प्रभाव टाकणारा जर्मनीतील शाही महाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीत श्वांगाऊ शहरात २,६२० फूट उंचीवरील हा महाल १८८६ मध्ये बांधण्यात आला होता. जर्मन भाषेत याला नौश्वास्टेन कॅसल (इंग्रजी अनुवाद- न्यू स्वानस्टोन कॅसल) असे म्हणतात. थिएटर डायरेक्टर आणि ऑपेरासाठी प्रसिद्ध असलेल्या रिचर्ड व्हेगनर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जर्मनीतील लुदविग द्वितीय या राजाने हा महाल बांधला होता.
 
या राजाची ख्याती चांगली होती. त्याचाच एक दाखला म्हणजे हा महाल. जनतेचा एकही पैसा न घेता राजाने स्वत:च्या पैशाने तो बांधला. ४० व्या वर्षी राजाचे निधन झाले. त्यानंतर राजघराण्याने हा शाही महाल सामान्य नागरिकांसाठी खुला केला. आजही हा महाल पाहण्यासाठी वर्षभरात जवळपास १३ लाख नागरिक येतात. अमेरिकेतील उद्योजक, अॅनिमेटर वॉल्ट डिस्ने यांच्यावरदेखील या महालाचा प्रभाव होता. वॉल्ट यांनी याच धर्तीवर डिस्नेलँडमध्ये स्लीपिंग ब्यूटी कॅसल बांधला. फेअरी टेल कॅसल या नावाने तो ओळखला जातो. }imgur.com
 
बातम्या आणखी आहेत...