आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षित देशांच्या यादीत जर्मनी अव्वल स्थानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर्मनी हे पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षक ठिकाण असून जगातील सुरक्षित देशांच्या यादीत हा देश अव्वल असल्याचा दावा जर्मनीचे भारतातील राजदूत मार्टिन ने यांनी केला आहे. युरोपातील इतर देश आणि अमेरिकेच्या कोणत्याही शहरापेक्षा जर्मनी अधिक सुरक्षित आहे, असे मार्टिन म्हणाले. बर्लिनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जगाचे लक्ष वेधले होते. 
 
ही घटना दुर्मिळ होती. युरोपातील इतर देश आणि अमेरिकेच्या तुलनेत जर्मनीवर असे हल्ले क्वचितच झाले आहेत. दक्षिण जर्मनी आणि इतर छोट्या गावांमध्ये पर्यटक मध्यरात्रीदेखील निर्भयपणे संचार करू शकतात. जर्मनीत १६०० अस्सल भारतीय पदार्थांचे रेस्टॉरंट्स आहेत. २०,००० देखणे आणि ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारे किल्ले येथे आहेत. योगा सेंटर्स आणि बॉलीवूड चित्रपटांच्या चाहत्यांची संख्या जर्मनीमध्ये भरपूर आहे, असे त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...