आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आफ्र‍िकन राजा जर्मनीत आहे मेकॅनिक, स्काइपच्या मदतीने करतो राज्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीफस बन्साह (67) हे कदाचित जगातील एकमात्र असे राजे असतील जे कार मॅकेनिकही आहेत. दुहेरी भूमिका करणारा हा आहे घाना आणि टोगो या 20 लाख लोकांचा राजा. बन्साह स्कायपच्या माध्‍यमातून आपल्या जनतेवर राज्य करतात. त्यांना टोगोमध्‍ये 'सुपीरियर अँड स्पिरिच्युएल चीफ ऑफ इवे पीपल' असे संबोधले जाते. त्यांचे पूर्ण नाव राजा टोगबे न्गोरयिफीआ सीफस बन्साह असे आहे. जर्मन छायाचित्रकाराने राजाबरोबर व्यतीत केला एक दिवस...
सन 2000 मध्‍ये बन्साह यांचा विवाह जर्मनीची ग्रॅबिएलशी झाला होता. त्यांना कार्ली आणि कथरीना असे दोन आपत्य आहेत. दुहेरी भूमिका करणा-या या राजाविषयी जगाला सांगण्‍यासाठी जर्मन छायाचित्रकार ख्रिस्त‍िना जायबिकने त्यांच्याबरोबर एक पूर्ण दिवस व्यतीत केला. त्यांचे दैनंदिन दिनचर्या त्याने आपल्या कॅमे-यात कैद केले. बन्साह यांनी घानाला येण्‍याचे आमंत्रणही दिले आहे. वास्तविक ते कसे राजे आहेत आणि त्यांचा प्रजेवर किती भरोसा आहे हे पाहायचे होते. ख्रिस्तिना याच वर्षी सप्टेंबर महिन्यात घानाला जात आहे.
70 च्या शतकात आले होते जर्मनीला, इथलेच होऊन गेले
- घानात जन्म झालेल्या सीफस राजा होण्‍यापूर्वी म्हणजे 1970 मध्‍ये जर्मनीला आले होते.
- त्यांची राजधानी पूर्व घानातील जबी हे शहर आहे.
- त्यांचे आजोबा येथील राजे होते. आजोबांनीच त्यांना मॅकेनिकचे प्रशिक्षण घेण्‍यासाठी जर्मनीला पाठवले होते.
- शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि जर्मनीचे नागरिकत्व घेतले. त्यांनी जर्मनीच्या ल्यूडिगशेफेनमध्‍ये स्वत:चे गॅरेज सुरु केले.
एक फॅक्स आला आणि आयुष्‍य बदलून गेले
- 1987पर्यंत ते शांततापूर्ण जीवन जगत होते. या दरम्यान त्यांना एक फॅक्स आला आणि त्यांचे आयुष्‍यच बदलून गेले.
- त्यांचे आजोबा आणि होहोईचे राजांचे निघन झाले.
- त्यांचे पिता आणि मोठा भाऊ राजापदासाठी अपात्र होते. कारण ते डावखूरे होते. यास इबेचे लोक शुभ मानता नव्हते.
- यानंतर सीफास यांना त्यांच्या आजोबाचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.
वर्षातून 8 वेळेस जातात आपल्या मायदेशी
- ते स्कायपच्या माध्‍यमातून लोकांवर राज्य करतात आणि वर्षातून 8 वेळेस घानाला जातात.
- ते आपल्या देशात शाळा चालवतात.
- सध्‍या राजा महिला तुरुंगासाठी पैसे जमवत आहेत.
- निधी जमा व्हावा यासाठी ते स्वत:चे बियर अकोसोंबो विकतात. मात्र ते स्वत: दारु पित नाहीत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, राजा बन्साहची छायाचित्रे...