आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका रात्रीत रिकामे झाले होते हे शहर, आता लोकांना \'नो एंट्री\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायप्रसचे वरोशा शहर निर्मनुष्‍य बनले आहे. - Divya Marathi
सायप्रसचे वरोशा शहर निर्मनुष्‍य बनले आहे.
वरोशा - बेटांचा देश सायप्रस. या देशातील वरोशा शहर कधीकाळी जगातील आघाडीचे पर्यटन स्थळ होते. पण आता याची गणना सर्वात मोठे भूतांच्या शहरांमध्‍ये समावेश होतो. 1974 मध्‍ये तुर्कस्तानच्या हल्ल्यानंतर हे शहर एका रात्रीत रिकामे झाले. तेव्हापासून चाळीस दशकांपेक्षा जास्त काळ वरोशा निर्मनुष्‍य झाला आहे. लोकांना येथे यायला परवानगी नाही...

- फमागस्ता प्रांतातील या शहराची लोकसंख्‍या जवळपास 40 हजार होती. तुर्कस्तान सैन्याच्या हल्ल्याच्या रात्री ही संख्‍या शून्यावर गेली होती.
- नरसंहाराच्या भीतीमुळे शहरातील सर्व लोक पळून गेले व आसपासच्या शहरांमध्‍ये आश्रय घेतला.
- तुर्कस्तान सैन्याने युरोपीय देश सायप्रसवर ग्रीस राष्‍ट्रवाद्यांचे तख्‍तापलटाच्या विरोधात हल्ला केला होता.
- तुर्कस्तानच्या दाव्यानुसार हल्ल्यामागे बेटावर राहत असलेले तुर्क अल्पसंख्‍याकांना संरक्षण देणे हे महत्त्वाचे कारण होते.
- याचा परिणाम असा झाला, की ग्रीस सायप्रस व तुर्क सायप्रस अशा दोन भागात विभागले गेले.
- जुलै 1974 मध्‍ये झालेल्या या युध्‍दानंतर वरोशा शहर तुर्कस्तानच्या सैन्याच्या नियंत्रणाखाली आले आहे
- येथे तुर्कस्तान सैन्याच्या गस्तीच्या टीमशिवाय कोणालाही येथे भेट देण्‍याची परवानगी नाही.
- या हल्ल्यानंतर सायप्रसच्या दोन्ही भागात अनेक शहरे वसवले गेले. मात्र वरोशा जैसे थे अवस्थेत आहे.
- दोन्ही भागाला विभागणा-या ग्रीन झोनच्या उत्तरेला असणा-या वरोशावर तुर्कस्तान सैन्याने कडक निर्बंध लादले आहेत.
- कुंपणाने घेरलेल्या या शहराच्या बाजूच्या शहरांमध्‍ये जिवंतपणा जाणवतो. मात्र हे शहर निर्जीव बनले आहे.
- हॉटेल, रहिवाशी इमारतींपासून बार व रेस्तरॉंपर्यंत सर्वकाही स्मशानात बदलले आहे.
- एक चिंचोळासा भाग सोडल्यावर बहुतेक बीच कायमचे बंद करण्‍यात आली आहेत.
- कुंपणातून आत जाणे लांबची गोष्‍टी असून बाहेरुन छायाचित्रे काढल्यास अटक होऊ शकते.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...