आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीणीवर बलात्कार चालू होता, वाचवण्‍याऐवजी व्हिडिओ बनवून केले लाइव्ह स्ट्रीमिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोनिनाच्या (छायाचित्रात)17 वर्षांची मैत्रीणीवर 29 वर्षांच्या रेमंड गेट्सने बलात्कार केला. - Divya Marathi
लोनिनाच्या (छायाचित्रात)17 वर्षांची मैत्रीणीवर 29 वर्षांच्या रेमंड गेट्सने बलात्कार केला.
ओहिओ - अमेरिकेत एका किशोरवयीन मुलीवर आपल्याच मैत्रीणीच्या बलात्काराची घटना लाइव्ह स्ट्रीमिंग केल्याचा आरोप करण्‍यात आला आहे. आरोपी 18 वर्षांची मेरिना लोनिना आहे. शुक्रवारी तिने न्यायालयात सांगितले, की पुरावा म्हणून तिने बलात्काराची घटना लाइव्ह केली होती.लोनिनाच्या 17 वर्षांच्या मैत्रिणीवर 29 वर्षांच्या रेमंड गेट्सने बलात्कार केले होते. रेमंड आणि लोनिनावर बलात्कार, अपहरण आणि अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार अशा गंभीर गुन्ह्यात सामील असल्याचा आरोप आहे. न्यायालयात लोनिनाने काय म्हटले...
- शुक्रवारी न्यायालयात वकिलाने सांगितले, की लोनिना बलात्काराची लाइव्ह स्ट्रीमिंग करुन हा गुन्हा थांबवू इच्छित होती. तिने हे फुटेज पुरावा म्हणून रेकॉर्ड केले.
- लोनिनाने न्यायालयाला विनंती केली आहे, की तिला दोषी म्हणून घोषित करु नये. ती फक्त मदत करीत होती. न्यायाधीशांनी तिच्याकडून 1.25 लाख डॉलरचे हमीपत्र भरवून घेतले आहे.
- तिचा सहआरोपी रेमंडला तीन लाख डॉलरचे हमीपत्र भरायला सांगितले आहे.
- जर दोन्ही गुन्हे सिध्‍द झाल्यास त्यांना 40 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
संपूर्ण प्रकरण काय आहे
- लोनिना आणि तिची पीडित मैत्रीण कोलंबस शहरातील अल्बनी हायस्कूलची विद्यार्थींनी आहे. आरोपी रेमंडशी दोघींची भेट एका मॉलमध्‍ये झाली. येथे त्याने दोघींना व्होडका खरेदी करुन दिले होते.
- यानंतर रेमंडने दोन्ही मुलींना पुन्हा भेटायला सांगितले.
- 17 फेब्रूवारीला एका घरात तिघे एकत्र होते. यावेळी रेमंडने पीडित मुलीवर बलात्कार केला. मेरिनाने मै‍त्रीणीला वाचवण्‍याऐवजी घटनेची पेरिसस्कोप अॅपच्या मदतीने लाइव्ह स्ट्रीमिंग केले होते.
- हे अॅप युजर्सला जगभरात कुठेही लाइव्ह स्ट्रीमिंग करण्‍याची सुविधा पुरवते.
- लोनिनाच्या एका मित्राने जेव्हा लाइव्ह व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याने पोलिसांना याची माहिती दिली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मेरिना लोनिनाचे छायाचित्रे...