आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Child Was Saved Safely By Two Indians In Singapore

VIDEO: सिंगापूरमध्ये चिमुकली अडकली बाल्कनीला, भारतीयाने वाचविला जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूरच्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटच्या बाल्कनीत तीन वर्षांची चिमुकली खेळत होती. यावेळी बाल्कनीला असलेल्या रेलिंगमधून ती बाहेर पडली. पण तिचे डोके रेलिंगमधून बाहेर येऊ शकले नाही. त्यामुळे ती खाली पडली नाही. पण रेलिंगमध्ये मात्र अडकून पडली. दोन भारतीयांना ही घटना दिसली. त्यांनी सिंगापूर सिव्हिल डिफेंस फोर्सला (SCDF) फोन केला. त्यानंतर लगेच फोर्सची टीम घटनास्थळी पोहोचली. परंतु, तोपर्यंत हे दोघे दुसऱ्या मजल्यावर पोहोचले होते. त्यांनी चिमुकलीचा जीव वाचवला.
या दोन भारतीयांची नावे एस श्यामुगुन नाथन (वय 35) आणि पी. मुथुकुमार (24) अशी आहेत. नाथन चार वर्षांपासून तर मुथुकुमार गेल्या तीन वर्षांपासून सिंगापुरमध्ये काम करीत आहेत. हे दोघे गुरुवारी जुरोंग ईस्टमध्ये काम करीत होते. यावेळी त्यांना इमारतीच्या बाल्कनीत चिमुकली अडकलेली दिसली. त्यांनी लगेच SCDF ला फोन केला. फ्लॅटचे दार ठोठावले. पण आतून कुणीच काही प्रतिसाद देत नव्हते. अखेर दोघे पाईपच्या मदतीने इमारतीच्या बाल्कनीत चढले. दोघांनी SCDF च्या मदतीने चिमुकलीला वाचवले.
चिमुकलीचा जीव वाचवल्याने या दोघांचा सिव्हिल स्पिरिटनेस अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला. दोघांचे कौतुक करण्यात येत आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या चिमुकलीला दोन भारतीयांनी कसे वाचविले याचा व्हिडिओे.....