आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Escaped Very Closely From Railway Track In Australia

रेल्वेखाली येणारच होती.. पण थोडक्यात बचावली तरुणी, समोर आला Video

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - ऑस्ट्रेलियामध्ये फ्लेमिग्टन रेल्वे स्थानकावरील एक अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. फुटेजमध्ये प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करणारी एक तरुणी अत्यंत थोडक्यात बचावली आहे. फुटेजमध्ये ही घटना स्पष्ट दिसत आहे. एका महिलेने मदत केल्याने ही तरुणी बचावली. सिडनीच्या जवळ असलेल्या फ्लेमिग्टन स्थानकावरील ही घटना आहे.

व्हिडीओमध्ये काय...
सीसीटिव्ही फुटेजमध्ये एक मुलगी आपल्या मित्रांबरोबर प्लॅटफॉर्मवर उभी असल्याचे दिसते आहे. यादरम्यान त्यांचे 'हुला हूप' (कमरेत फिरवली जाणारी रिंग) ट्रॅकवर पडली. ती परत उचलण्यासाठी तरुणीने ट्रॅकवर उडी मारली. पण ती परत येणार तेढ्यात अत्यंत वेगाने एक रेल्वे त्या ट्रॅकवर आली. तरुणी चढण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक एक महिला त्याठिकाणी आली आणि तिने अत्यंत चपळाईने त्या तरुणीला वर खेचले. त्या महिलेने वेळीत तरुणीची मदत केली नसती तर तरुणीचे बचावणे अवघड होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा घटनेचे काही Photo
वरील स्लाइडवर क्लिक करून पाहा, Video