लंडन- यापेक्षा अधिक दु:खदायक काय असू शकते, की जीवनात
आपली सर्वात जवळची व्यक्ती आपल्याला आेळखू शकत नाही. काही अशाच प्रसंगांचा सामना ब्रिटनमधील युवक स्टुअर्ट करत आहे. जेव्हा त्याची प्रेयसी जेनीला विस्मरणाची व्याधी जडली. परंतु, स्टुअर्टने हार मानली नाही. त्याने जेनीसोबत घालवलेल्या गेल्या तीन वर्षांतील आठवणी जपून ठेवल्या होत्या. ते क्षण पकडून ठेवले होते.
इतकेच नाही तर त्याने स्क्रॅपबुकमध्ये सजवलेल्या त्या गोष्टी त्याने जेनी हिला दाखवायला सुरुवात केली. दोघेही आता 20 वर्षांचे आहेत. परंतु, जीवनातील संघर्षाचा सामना करत आहेत. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. जेनीची ही स्थिती मंदूच्या विकाराने झालेली आहे. नॉटिंघम विद्यापीठाची विद्यार्थिनी जेनी एक दिवस कार्यालयात काम करताना अचानक पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत ती कोमात गेली होती. तिला विस्मरण झाले.
स्टुअर्टच्या मदतीने स्क्रॅपबुक बनवण्याचे ठरवले. जेनी खूप दु:खी होती. त्या वेळी तिला जवळचेही अनोळखी वाटत होते. जेनी म्हणते, मी आई-वडील आणि स्टुअर्टची आभारी आहे. त्यांनी एका क्षणासाठीही आपल्याला असाह्य भासू दिले नाही. रात्रभर ते माझ्याजवळ राहायचे.
आपण धीर सोडला नाही. ज्या वेळी वाटले की स्टुअर्ट आणि मी प्रेमाच्या सागरात डुंबू शकतो, आठवणीतील क्षण जागवू शकतो त्यासाठी प्रयत्न केले. त्याला ईश्वराची देण मानले आणि भूतकाळाला भविष्याशी जाेडण्याचा प्रयत्न केला. स्टुअर्ट म्हणतो, जेनीमध्ये सुधारणा होत असल्याचे पाहून आनंद होत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, जेनी आणि स्टुअर्टचे काही निवडक फोटो...