आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोको हरमने आेलीस ठेवलेल्यांची सुटका, ३०० महिला-मुली सुखरूप परतल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैदुगुरी - गेल्या वर्षी बोको हरमने आेलीस ठेवलेल्या ३०० मुली-महिलांची सुखरूप सुटका करण्यात नायजेरियन लष्करास यश आले आहे. लष्कराने बुधवारी ट्विटरवरून ही खुशखबर दिली. ही बातमी धडकल्यानंतर आेलीस महिलांच्या नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला.
एप्रिल २०१४ मध्ये बोको हराम या कट्टरवादी गटाने ३०० शालेय मुलींचे अपहरण करून त्यांना आेलिस ठेवले होते. साम्बिसा जंगलातील दहशतवादी तळांवर त्यांना ठेवण्यात आले होते. त्याअगोदर महिलांना ट्रकने नेण्यात आले होते. त्यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढला होता. त्याचबरोबर ‘ब्रिंगबॅकअवर गर्ल्स’ ही माेहीमही सुरू करण्यात आली होती. मुलींच्या अपहरणामुळे बोको हरामने जागतिक समुदायाचे लक्ष वेधले होते. दरम्यान, बोको हरामने आपल्या अत्याचाराच्या छावणीत शेकडो महिला-मुलांची हत्या केली होती.
दमास्कस शहराजवळ लहान मुले-महिलांचे अवशेष मिळाले आहेत. दरम्यान, नायजेरियातील आदिवासी प्रांतात अजुनही बोको हरमने सातत्याने दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या आहेत.
गुलामी आणि कारवाया
एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना पळवून नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात होते. त्यांना गुलाम म्हणून वागणूक दिली जात होती. त्याचबरोबर दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा वापर करून घेतला जात होता.

एक महिन्यापूर्वी सुगावा
नायजेरियाच्या लष्कराला एक महिन्यापूर्वी साम्बिसा जंगलात या मुलींना ठेवण्यात आल्याचा सुगावा मिळाला होता. त्यानुसार बोको हरामच्या तळांवर लष्कराने हवाई हल्ले केले होते. त्यात काही महिलांचा मृत्यू झाला होता.
बातम्या आणखी आहेत...